कोपरगाव प्रतिनिधी, दि. १२ : कोपरगाव तालुक्यातील कोपरगाव तालुका सहकारी कापूस जिनींग अँड प्रेसिंग सोसायटीची संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक माजी आमदार अशोकराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली व आमदार आशुतोष काळे यांच्या नेतृत्वाखाली बिनविरोध पार पडली आहे.
कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व उद्योग समुहाचे संस्थापक कर्मवीर शंकररावजी काळे साहेब यांनी कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या कापसाला योग्य दर मिळावा यासाठी कोपरगाव येथे जिनींग अँड प्रेसिंग सोसायटीची स्थापन करून शेतकऱ्यांचे हित जोपासले. ही संस्था सातत्याने प्रगतीपथावर आहे.
या संस्थेची २०२३ ते २०२८ या कालावधीसाठी होणारी संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच बिनविरोध झाली असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी नामदेवराव ठोंबळ यांनी जाहीर केले आहे. संचालक पदासाठी निवडणूक कार्यक्रमानुसार नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या मुदतीपासून अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवसापर्यंत एकूण १३ जागांसाठी १३ उमेदवारी अर्ज दाखल होवून तेवढेच अर्ज शिल्लक राहिल्याने निवडणूक निर्णय अधिकारी नामदेवराव ठोंबळ यांनी अर्ज दाखल केलेल्या सर्व उमेदवरांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.
बिनविरोध निवडून आलेले सदस्य पुढीलप्रमाणे गोरक्षनाथ ज्ञानदेव जामदार,सचिन वसंतराव आव्हाड,गणेश शंकरराव गायकवाड,पाराजी दादा गवळी,नानासाहेब शशिकांत चौधरी, संदीप सुदाम शिंदे, नानासाहेब भागवत निकम, महेश बाळासाहेब लोंढे, संजय विठ्ठल संवत्सरकर, सुभाष भास्करराव सोनवणे, शंकर यमाजी गुरसळ, सौ.विमलबाई ज्ञानदेव गवारे, सौ. कांताबाई धर्मा दहे या सदस्यांची बिनविरोध निवड झाली आहे. सर्व नवनिर्वाचित सदस्यांचे कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व उद्योग समुहाचे मार्गदर्शक माजी आमदार अशोकराव काळे, आमदार आशुतोष काळे यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.
कोपरगाव तालुका जिनींग अँड प्रेसिंग सोसायटीच्या संचालक मंडळावर झालेल्या निवडीबद्दल सर्व नवनिर्वाचित सदस्यांनी माजी आमदार अशोकराव काळे, आमदार आशुतोष काळे यांचे आभार मानले असून संस्था सातत्याने प्रगतीपथावर घेवून जाण्यासाठी विश्वासाने दिलेली जबाबदारी पार पाडणार असल्याचे सांगितले आहे.