कोल्हे साखर कामगार पतपेढी स्वस्त धान्य दुकानातुन ३२५ लाभार्थ्यांना आनंदाचा शिधा वाटप – रमेश घोडेराव

 कोपरगाव प्रतिनिधी, दि. १४ :  तालुक्यातील शिंगणापूर येथील सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कामगार पतपेढी स्वस्त धान्य दुकानातून ३२५ लाभार्थ्यांना गुढीपाडवा व भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर जयंती निमीत्त शासनाच्या आनंद शिधाचे वाटप करण्यांत आल्याची माहिती कारखान्याचे उपाध्यक्ष रमेश घोडेराव यांनी दिली. प्रारंभी संस्थेचे अध्यक्ष देवराम केदू देवकर यांनी कामगार पतपेढीमार्फत वर्षभरात राबविलेल्या विविध सामाजिक उपक्रमाची माहिती दिली. उपाध्यक्ष सुदाम उगलमुगले यांनी उपस्थितांचे स्वागत केले.

 घोडेराव पुढे म्हणाले की, माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी संजीवनी उद्योग समुहाच्या माध्यमांतून सर्व घटकामध्ये सत्तेचे विकेंद्रीकरण करून प्रत्येकांचा विकास साधला आहे. ही पतपेढी जिल्हयात अग्रगण्य आहे. संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी सभासद शेतक-याबरोबरच कामगार घटकाच्या सर्वांगीण विकासाला सर्वोच्च प्रधान्य दिले आहे.

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर हे जगाचे महामानव होते. त्यांनी संविधानातुन भारतीय लोकशाहीला बळकटी देण्याचे महान काम केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांच्या सर्व सहकारी मंत्री मंडळाने दारिद्ररेषेखाली घटकांसह गोरगरीब, तळागाळातील लाभार्थ्यांना गुढीपाडवा व आंबेडकर जयंतीनिमीत्त स्वस्त धान्य दुकानातुन आनंदाचा शिधा वाटप करण्याची मोहिम हाती घेवुन सर्वांना दिलासा देण्याचे काम केले आहे असेही ते शेवटी म्हणाले.

             याप्रसंगी संस्थेचे संचालक सर्वश्री. विलास कहांडळ, साईनाथ तिपायले, सुरेश मगर, केशव बटवाल यांच्यासह सर्व सभासद लाभार्थी मोठया संख्येने उपस्थित होते. उपाध्यक्ष सुदाम उगलमुगले यांनी आभार मानले. व्यवस्थापक राजेंद्र सोनवणे यांनी सुत्रसंचलन केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी वितरण विभागाचे गोरख चोपडे व त्यांच्या सहका-यांनी विशेष परिश्रम घेतले.