प्रभाग क्र ३ मधील रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करा

Mypage

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

Mypage

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २७ :  कोपरगाव शहरातील प्रभाग क्रमांक ३ मधील श्री साईबाबा मंदिर ते ठक्कर घर बाजार तळ रस्ता व श्री संत ज्ञानेश्वर स्कुल ते शेखर कोलते घर बाजारतळ रस्ता या रस्त्यांची अतिशय दुरावस्था झाली असून या रस्त्याचे काम लवकरात लवकर सुरु करावे अशा आशयाचे निवेदन आ. आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांना देण्यात आले.

Mypage

दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, शहराच्या प्रभाग क्रमांक ३ मधील मोठी वर्दळ असणाऱ्या श्री साईबाबा मंदिर ते ठक्कर घर बाजार तळ रस्ता व श्री संत ज्ञानेश्वर स्कुल ते शेखर कोलते घर बाजारतळ रस्ता या रस्त्यांची दुरावस्था झाल्यामुळे सर्वत्र धुळीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना व लहान मुलांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

Mypage

त्यामुळे या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करणे अत्यंत गरजेचे आहे. नागरिकांना होत असलेल्या त्रासाची दखल घेवून लवकरात लवकर या रस्त्याचे काम सुरु करून नागरिकांना होत असलेल्या त्रासातून मुक्तता करावी असे दिलेल्या निवेदनात शेवटी म्हटले आहे.

Mypage

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुनील गंगूले, माजी नगरसेवक रमेश गवळी, मनोज नरोडे, संतोष शेजवळ, फिरोज पठाण, अंकुश देशमुख, सौ. सुवर्णा भडकवाडे, नीलम बोऱ्हाडे, डॉ. अक्षय दगडे, कमला दगडे, शुभम राऊत, अनिल राऊत, रविंद्र राऊत, शारदा राऊत, सौ. रंजना गवळी, पूजा राऊत, सौ. सारिका नागरे, सौ. शिल्पानागरे, सौ. द्वारका नागरे, गोरख कावडे, अनिल इंगळे, ऋषी बिडवे, वैभव उदावंत, मदनलाल बडजाते, 

Mypage

सौ. शोभा महापुरे, सौ. लीला क्षीरसागर, शुभम क्षीरसागर, सौ. बागुल, सौ. जयश्री बडजाते, राहुल बागुल, राजेंद्र कोतकर, शाहबाज हुसेन, बशरतशेख, एहसानशेख, सौ. कल्पना वाणी, संतोष सोनवणे, रमेश चव्हाण, चंद्रकांत उदावंत, विठ्ठल विसपुते, अनुसया गाडेकर, एस.आर. पठाण, एस.के. आदित्य आदी उपस्थित होते.

Mypage

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *