डॉ. बाबासाहेबांनी समता, बंधुता आणि लोकशाहीची मुल्ये रुजविण्यासाठी संपूर्ण आयुष्य वेचले –  आमदार काळे

कोपरगाव प्रतिनिधी, दि.०६ : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आ. आशुतोष काळे यांनी कोपरगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी आ.आशुतोष काळे म्हणाले की, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाज एकसंघ ठेवण्यासाठी प्रयत्न करून समाजाच्या प्रगतीसाठी मोठे योगदान दिले आहे.

आपल्या अद्वितीय ज्ञानाचा उपयोग मानवाच्या कल्याणासाठी करून समाजात समता, बंधुता आणि लोकशाहीची मुल्ये रुजविण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्यकर्तुत्व जेवढे महान होते, तेवढेच त्यांचे विचारही महान होते. त्यांच्या विचारात जीवन जगण्याची कला दडलेली होती. राज्यघटनेच्या निर्मितीध्ये त्यांच्या अजोड योगदानातून आपल्या देशाला आदर्श राज्यघटना मिळाली त्यामुळे बलशाली राष्ट्र निर्माण होवू शकले. त्यांनी दिलेल्या योगदानाप्रती कृतज्ञ राहून त्यांच्या स्वप्नातील भारत देशाच्या निर्मितीसाठी त्यांच्या विचारांशी नेहमी कटिबद्ध राहावे असे आवाहन आ.आशुतोष काळे यांनी यावेळी केले.

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कोपरगाव शहरात बुद्धिस्ट यंग फोर्सच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य रक्तदान शिबिराला आ.आशुतोष काळे यांनी भेट दिली. याप्रसंगी त्यांच्या हस्ते रक्तदात्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. महापरिनिर्वाण दिनानिमित्त रक्तदान शिबिरासारखा स्तुत्य उपक्रम राबवल्याबद्दल त्यांनी बुद्धिस्ट यंग फोर्सच्या सदस्यांचे कौतुक केले.

यावेळी बुद्धिस्ट यंग फोर्सचे विजय त्रिभुवन, भीमराव गंगावणे, मनोज शिंदे, राजेंद्र उशिरे, नितीन शिंदे, राजेंद्र पगारे, अरुण त्रिभुवन, सोमनाथ खंडीझोड, संजय दुशिंग, सोमनाथ वाघ, देवेंद्र बनकर, नाना रोकडे, महेश दुशिंग, भारत सदर, रविंद्र धिवर, गणेश पवार, महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमचंद बागरेचा, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुनील गंगुले, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुधाकर रोहोम, 

जिनिंग व प्रेसिंगचे चेअरमन गोरक्षनाथ जामदार, राष्ट्रवादी सोशल मीडिया सेलचे प्रदेश सरचिटणीस अशोक आव्हाटे, युवक जिल्हाध्यक्ष कृष्णा आढाव, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर म्हस्के, माजी नगरसेवक गटनेते विरेन बोरावके, मंदार पहाडे, संदीप पगारे, रमेश गवळी, फकीर कुरेशी, राजेंद्र वाकचौरे, सुनील मोकळ, प्रकाश दुशिंग, डॉ. तुषार गलांडे, जावेद शेख, दादासाहेब साबळे, नितीन शिंदे, राहुल खंडिझोड, धनंजय कहार, ऋषीकेश खैरनार, प्रशांत वाबळे, मुकुंद इंगळे, अंबादास वडांगळे, आकाश डागा, राजेंद्र जोशी, सचिन गवारे, गणेश बोरुडे, शैलेश साबळे, शुभम लासुरे, एकनाथ गंगूले, मनोज कडू, राजेंद्र आभाळे, महेश उदावंत, शंकर घोडेराव, विशाल निकम, नारायण लांडगे, रोशन शेजवळ, संदीप सावतडकर, 

प्रदीप मते, विजय दाभाडे, श्रेणीक बोरा, बाळासाहेब शिंदे, डॉ.आतिष काळे, अमोल गिरमे, संतोष शेजवळ, दिनेश संत, चांदभाई पठाण, बाळासाहेब सोनटक्के, हारुण शेख, मनोज कपोते, मनोज शिंदे, राजेंद्र उशिरे, सोमेश शिंदे, विशाल शिंदे, बाळासाहेब पवार, विशाल शिंदे, साजिद शेख, कैलास साळवे, राजेंद्र कोपरे, संजय कोपरे, तुषार साठे, जनार्दन शिंदे, दिनेश गायकवाड, अमोल आढाव, मधुकर पवार, संतोष रेठे, जगन कांबळे, सोनू कोपरे, अनिल बनसोडे आदींसह भीम अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.