कोपरगावचे तहसीलदार लाचलुचपतच्या जाळ्यात 

Mypage

वाळूवाल्याकडून हाप्ते  घेताना केली अटक

Mypage

 कोपरगाव प्रतिनिधी, दि. १९ : कोपरगावचे तहसीलदार विजय बोरुडे यांनी आपल्या पंटरच्या मदतीने एका वाळूवाल्याकडून महीण्याला ठराविक हाप्ता घेण्याचे ठरले त्यानुसार तहसीलदार यांच्यावतीने हाप्ते घेणार गुरमितसिंग पुर्ण नाव समजू शकले नाही यांच्या मार्फत वाळेचा हाप्ता वसुली करीत होते.

Mypage

  शुक्रवारी सायंकाळी एका वाळूवाल्याला मासिक ६० हजार रुपया प्रमाणे हाप्ता वसुली पोटी २० हजार रुपये देण्याचे ठरले. संबंधीत वाळुवाल्याने यांची तक्रार नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली असता. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा लावून तहसील विजय बोरुडे यांचा पंटर गुरमितसिंग याला रंगेहाथ पकडण्यात आले असता त्याने तहसीलदार यांच्यासाठी आपण ही वसुली करीत असल्याचे सांगितले.

Mypage

त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तहसील बोरुडे यांना ताब्यात घेवुन त्यांच्यावर ही कारवाई केली आहे. तहसीलदार विजय बोरुडे यांच्याकडून अधिक चौकशी करण्यासाठी त्यांना शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये घेवून गेले असुन राञी उशिरा कोपरगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

Mypage

 दरम्यान काही दिवसांपूर्वी  पोलीस निरीक्षक वासुदेव देसले व तहसीलदार बोरुडे यांच्यातील शीतयुद्ध कोपरगावकरांनी अनुभवले. तहसीलदार यांच्या एका वादग्रस्त प्रकरणाने तालुक्यात खळबळ उडाली होती. मागच्या प्रकरणातील आरोपातून तहसीलदार बाहेर पडण्याच्या आतच पुन्हा लाचलुचपतच्या जाळ्यात अडकल्याने तालुक्यासह जिल्ह्यात मोठी चर्चा सुरु झाली आहे.

Mypage

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *