कोपरगाव प्रतिनिधी, दि. १ : राजामाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्ताने सम्यक फाउंडेशनच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे तर प्रमुख पाहुणे म्हणून राज्य महिला आयोगाच्या सदस्या उत्कर्षाताई रुपवते, महिला काँग्रेस आय अ. जा. विभागाच्या जिल्हाध्यक्षा सविता विधाते शिक्षक बँकेचे संचालक शशिकांत जेजुरकर, विलास गवळी, योगेश वाघमारे, वीज तांत्रिक पतसंस्थेचे संचालक सिताराम खंडागळे, फाउंडेशनचे अध्यक्ष महेंद्र विधाते, कविता धिवरे आदिसह मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरवात थोर महापुरुषांच्या प्रतिमा पूजन व दीप प्रज्वललाने करण्यात आली. याप्रसंगी संजय उत्तम बोरसे, रमेश सयाजी टिक्कल यांना क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, तर आशिक लतीफ शेख यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार सौ.सारीका संदेश बारसे , सौ मनीषा ज्ञानेश्वर वाकचौरे / जाधव , श्रीमती नीलम सिताराम निघोट यांना छत्रपती शाहू महाराज आदर्श वैद्यकीय पुरस्कार डॉक्टर शिवाजी भानुदास रोकडे, छत्रपती शाहू महाराज आदर्श समाजसेवक पुरस्कार दत्तात्रय बाबुराव मलिक,
राजमाता जिजाऊ आदर्श सरपंच पुरस्कार सौ सुषमा वासुदेव देसले, राजमाता अहिल्यादेवी आदर्श समाजसेविका पुरस्कार सौ. सुहासिनी ओमप्रकाश कोयटे, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श साहित्यिक पुरस्कार सखाराम भिवाजी कांबळे, भारतरत्न लता मंगेशकर सांस्कृतिक पुरस्कार सौ सुधाभाभी कैलास ठोळे, सम्यक आदर्श व्यावसायिक पुरस्कार सौ. राजश्री शंकर दुपारगुडे, छत्रपती शिवाजी महाराज आदर्श व्यवस्थापक पुरस्कार सुधाकर मलिक, छत्रपती शाहू महाराज आदर्श लेखा परीक्षक पुरस्कार भास्कर केशव वाकोडे यांना देऊन सन्मानित करण्यात आले.
राजामाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनकार्यावर बोलताना लक्ष्मण नजन म्हणाले कि, अहिल्यादेवी होळकर यांनी त्यांच्या कारकिर्दी मध्ये केलेली विकास कामे आजही वापरात आहे. परंतु आजची विकासकामे वर्षभरही टिकत नाही हि शोकांतिका आहे.
या प्रसंगी राज्य महीला आयोगाच्या सदस्य उत्कर्षा रूपवते म्हणाल्या कि, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी महिलांच्या उत्थानासाठी उत्कर्षासाठी अन्नछत्रालय अशा सुविधा सुरू केल्या होते, परंतु आज त्याच भूमीमध्ये महिलांवर वाढणारे अत्याचार हे निंदनीय आहे. सर्व महिलांसाठी महिला आयोगाच्या माध्यमातून योग्य ते प्रयत्न करून न्याय देण्याचा प्रयत्न करू असे त्या म्हणाल्या.
पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांचा आदर्श आजही तळागाळातील जनसामान्यांमध्ये पसरलेला आहे. कोणीत्यांचा पुतळा हलवण्याचा जरी प्रयत्न केला तरी त्यांचे विचार मनातून कोणीही हलवू शकत नाही. त्यांनी ज्या पद्धतीने महिलांच्या रोजगारासाठी काम केले तसेच काम सहकार उद्यमी व समता पतसंस्थेच्या वतीने महिलांना रोजगार उपलब्ध करून देऊ.
सम्यक फाउंडेशन ने आज हा जो उपक्रम राबवला त्या उपक्रमाचे दखल घेऊन त्यांच्या मार्फत ज्या महिला येतील त्यांनाही रोजगार उपलब्ध करून देऊ असे कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच समता पतसंस्थेचे चेअरमन तथा राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष माननीय काका कोयटे त्यांनी आपल्या अध्यक्ष भाषणातून मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्तविक फॉउंडेशनचे अध्यक्ष महेंद्र विधाते यांनी केले. तर सूत्रसंचालन संदीप आहेर व आभार संदेश बारसे यांनी मानले.