आशा वर्कर गटप्रवर्तक व भारतीय कम्युनिस्ट पार्टीच्या विविध मागण्यांसाठी तहसिल कार्यालयात मोर्चा

शेवगाव प्रतिनिधी, दि. २७ : येथील आशा वर्कर, गटप्रवर्तक व भारतीय कम्युनिस्ट पार्टीच्यावतीने विविध मागण्या साठी तहसील कार्यालयावर आज बुधवारी मोर्चा काढण्यात आला. यावेळी महिलांच्या हातात विविध मागण्यांचे फलक होते. सरकार विरोधी घोषणाबाजी करीत हा मोर्चा शेवगाव पंचायत समितीच्या कार्यालयातून काढण्यात आला. आशा सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन वेतन व भविष्य निधी देण्यात यावा.

वर्षातून एक महिना सुट्ट्या देण्यात याव्यात, आदि मागण्यां बरोबरच मणिपूर येथे झालेल्या, अत्याचाराबाबत तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. कॉम्रेड संजय नांगरे, संदीप इथापे, भगवान गायकवाड, रामभाऊ लांडे, गोरक्ष काकडे, बाबुलाल सय्यद, बापूराव राशिनकर, संजय डमाळ, मीना भस्मे, अंजली भुजबळ, सुवर्ण देशमुख, ज्योती गंगावणे, वैशाली देशमुख ,संगीता रायकर, वनिता खर्चन, सुमित्रा महाजन, सुनिता सोनटक्के, सीता थोरवे, स्वाती गाडेकर, रंजना परदेशी, अलका या कार्यकर्त्यांनी मोर्चाचे नियोजन केले होते.

तहसीलदार प्रशांत सांगडे तसेच डॉक्टर संकल्प लोणकर यांनी निवेदन स्वीकारून ते शासनाकडे पाठवण्यात येईल असा दिलासा दिला. यावेळी गुप्त वार्ता विभागाचे बाबासाहेब धाकतोडे उपस्थित होते.