सेवा निवृत्ती आयुष्याचे दुसरे पर्व – आमदार आशुतोष काळे

Mypage

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २७ : नियमाप्रमाणे जरी कारखाना व उद्योगसमुहाच्या सेवेतून निवृत्त होत असला, तरी उद्योग समूह व काळे परिवाराच्या ऋणानुबंधनातून आपण कधीही निवृत्त होणार नाही. निवृत्त होत आहात म्हणजे आयुष्य संपलेले नसून सेवा निवृत्ती हे आयुष्याचे दुसरे पर्व आहे, असे प्रतिपादन कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आमदार आशुतोष काळे यांनी केले आहे. कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व आसवनी विभागातील सेवा निवृत्त होणाऱ्या ४५ कर्मचा-यांच्या सेवा निवृत्तीनिमित्त कर्मचाऱ्यांचा कुटुंबासह आयोजित करण्यात आलेल्या सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

Mypage

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कारखान्याचे मार्गदर्शक व ज्येष्ठ संचालक माजी आमदार अशोकराव काळे होते. पुढे बोलतांना ते म्हणाले की, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या प्रगतीत ऊस उत्पादक शेतकऱ्यांप्रमाणे अधिकारी व कर्मचाऱ्यांचा देखील मोठा वाटा आहे. नोकरी करत असताना, एका वेळेनंतर सेवानिवृत्त व्हावेच लागते. सेवा निवृत्त होतांना काहीसे दु:ख होत असले, तरी आपण आपल्या आयुष्याच्या पहिल्या पर्वाची यशस्वी सांगता केली आहे, याचा आनंद व्यक्त करणे गरजेचे आहे.

Mypage

सेवा निवृत्ती आयुष्याचे दुसरे पर्व असून नव्या आयुष्याची अनोखी सुरुवात आहे. त्यामुळे सेवा करीत असताना ज्या गोष्टी करायच्या बाकी राहिल्या त्या गोष्टी पूर्ण करून आवडीचे छंद जोपासावेत तसेच धार्मिक व सामाजिक कार्यात सहभागी व्हावे. आजवर कर्मवीर शंकररावजी काळे, माजी आ. अशोकरावजी काळे यांच्यावर अतोनात प्रेम केले, ते प्रेम मलाही मिळाले ते मी माझे भाग्य समजतो. आपले सर्वांचे काळे परिवारावर असलेले प्रेम यापुढेही असेच अबाधित ठेवून आनंदी जीवन व्यतीत करा असा मौलिक सल्ला आ. आशुतोष काळे यांनी यावेळी दिला.

Mypage

या प्रसंगी कारखान्याचे मार्गदर्शक ज्येष्ठ संचालक मा. आ. अशोकराव काळे, व्हा. चेअरमन दिलीपराव बोरनारे, संचालक सुधाकर रोहोम, सूर्यभान कोळपे, सचिन चांदगुडे, वसंतराव आभाळे, शिवाजीराव घुले, श्रीराम राजेभोसले, अनिल कदम, राहुल रोहमारे, प्रविण शिंदे, दिनार कुदळे, डॉ. मच्छिन्द्रनाथ बर्डे, अशोक मवाळ, सुनील मांजरे, मनोज जगझाप, शंकरराव चव्हाण, सुरेश जाधव, विष्णु शिंदे, श्रावण आसने, गंगाधर औताडे, यांचेसह कारखान्याचे प्र. कार्यकारी संचालक संचालक सुनील कोल्हे, आसवनी विभागाचे जनरल मॅनेजर ज्ञानेश्वर आभाळे, सेक्रेटरी बाबासाहेब सय्यद, असि. सेक्रेटरी संतोष शिरसाठ, फायनान्स मॅनेजर सोमनाथ बोरनारे, लेबर ऑफिसर सुरेश शिंदे तसेच विविध खात्यांचे प्रमुख पदाधिकारी यांचेसह निवृत्त कर्मचारी आपल्या परिवारासह मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Mypage

कार्यक्रमाचे प्रास्तविक प्रभारी कार्यकारी संचालक सुनील कोल्हे यांनी केले. सुत्रसंचालन सेक्रेटरी बी. बी. सय्यद यांनी केले तर आभार व्हा.चेअरमन दिलीपराव बोरनारे यांनी मानले. यावेळी निवृत्त कर्मचारी व त्यांचे परीवाराने आपले मनोगत व्यक्त करतांना कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व उद्योग समूहाप्रती कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी निवृत्त कर्मचारी व त्यांचे परिवाराचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरुणकुमार चंद्रे यांनी केले तर आभार व्हा.चेअरमन दिलीपराव बोरनारे यांनी मानले.

Mypage

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *