शेवगाव श्रीरेणुका मल्टीस्टेट शाखेचा १९ वा वर्धापन दिन संपन्न

शेवगाव प्रतिनिधी, दि. २९ : देशभरात श्री रेणुका माता मल्टी स्टेटच्या तसेच देशा बाहेर विविध व्यवसायाच्या माध्यमातून आपल्या कार्य कर्तृत्वाचा ठसा उमटविणारे या संस्थेचे प्रवर्तक ज्येष्ठ अर्थ तज्ञ डॉ. प्रशांत चंद्रकांत भालेराव आज यशोशिखरावर असले तरी त्यांचे पाय जमिनीवर आहेत. त्यांना अतिशय चांगले समाज भान आहे. त्यांचे कडे गेलेला याचक रित्या हाती परतत नाही. हे मी पाहिले आहे. अशा संस्था, अशा विभूती समाजाच्या भूषण असल्याचे प्रतिपादन तारकेश्वर गडाचे महंत शांती ब्रह्म आदिनाथ महाराज शास्त्री यांनी केले.

नऊ राज्यात १३८ शाखांच्या माध्यमातून लाखो ग्राहकांना पुरविण्यात येणाऱ्या सेवेच्या माध्यमातून देशात आघाडीचे स्थान प्राप्त केलल्या श्री रेणुकामाता मल्टी स्टेट संस्थेच्या पहिल्या शाखेचा १९ वा वर्धापन दिन सोहळा श्रध्देय आदिनाथ महाराज शास्त्री यांचे उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते.

महाराज म्हणाले, श्री रेणुका माता मल्टीस्टेट संस्थेची पहिली शाखा शेवगावला सुरु झाली. आज या रोपट्याचा वटवृक्ष बनला आहे, या संस्थेच्या माध्यमातून विविध प्रसंगाचे औचित्य साधून समाज उपयोगी उपक्रम सातत्याने राबवीले जातात. यावेळी आयोजित सर्वरोग निदान व मोफत औषधोपचार शिबीराचे उद्घाटन शास्त्री महाराजांच्या हस्ते करण्यात आले. पावसाची रीपरीप चालू असतांना देखील अनेकांनी या शिबीराचा लाभ घेतला. या निमित्ताने संस्थेत दोन दिवस नवचंडी याग पूजा करण्यात आली. सरव्यवस्थापक अश्वलिंग जगनाडे सपत्नीक पूजेसाठी बसले. रेणुका भक्तानुरागी मंगल ताई भालेराव, जयंती भालेराव त्यासाठी उपस्थित होत्या.

राम महाराज झिजूर्के, उद्धव महाराज सबलस, परिविक्षाधीन आयपीएस अधिकारी बी चंद्रकांत रेड्डी, सपोनि आशिष शेळके, रजिस्ट्रार कोमल गायकवाड, भाजप राज्य सचिव अरुण मुंडे, ज्येष्ठ नेते माजी सभापती अरुण पाटील  लांडे, फुलचंद रोकडे, शिवाजीराव भुसारी, पाथर्डी चे प्रथम नगराध्यक्ष सुभाष घोडके, बबनराव भुसारी, अंबादास कळमकर, रामदास गोल्हार, रोटरीचे मनिष बाहेती, प्रदीप बोरुडे यांचे सह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी यावेळी उपस्थिती लावून शुभेच्छा दिल्या.

अरुण पाटील लांडे यांचे हस्ते आरोग्य शिबिरात सहभागी  डॉ.सुयोग बाहेती, डॉ .संजय लड्डा, डॉ. गणेश चेके, डॉ. विकास बेडके, डॉ. आशिष लाहोटी डॉ.पुरुषोत्तम बिहानी,डॉ. मयूर लांडे, डॉ.मनीषा लड्डा, अण्णासाहेब दिघे आदींचा सत्कार करण्यात आला. अ‍ॅड. नितीन भालेराव, विष्णुपंत भालेराव, कार्यकारी अधिकारी हरिश्चंद्र मोरे, सर व्यवस्थापक राजेंद्र नांगरे, श्रीमंत घुले, प्रा जनार्दन लांडे पाटील, बाळासाहेब चौधरी, एकनाथ कुसळकर यांनी सर्वांचे स्वागत केले. सर्वांसाठी सायंकाळी उशिरापर्यंत भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.