कोपरगाव प्रतिनिधी, दि. ०२ : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०३ व्या जयंतीनिमित कोपरगाव येथे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या माजी आमदार तथा भाजप नेत्या स्नेहलताताई कोल्हे यांनी स्वेच्छेने रक्तदान केले. रक्तदान हे श्रेष्ठ दान असून, रक्तदानामुळे लाखो लोकांना जीवनदान मिळते. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचे औचित्य साधून आयोजित केलेले रक्तदान शिबीर हा अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. युवकांनी सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून रक्तदानासाठी पुढे येऊन अशा समाजोपयोगी उपक्रमांना हातभार लावला पाहिजे, असे मत स्नेहलताताई कोल्हे यांनी याप्रसंगी व्यक्त केले.
कोपरगाव येथे भाजपच्या वतीने मंगळवारी १ ऑगस्ट रोजी साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०३ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांनी कोपरगाव शहरातील अण्णाभाऊ साठे स्मारक येथे जाऊन अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार घालून विनंम्र अभिवादन केले. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित सुजल चंदनशिव यांनी संगमनेर येथील आधार ब्लड सेंटरच्या सहकार्याने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरास स्नेहलताताई कोल्हे यांनी भेट देऊन या उपक्रमाचे कौतुक केले.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कार्यकर्तृत्वाला उजाळा देऊन स्नेहलताताई कोल्हे म्हणाल्या, आपण वेगवेगळ्या महापुरुषांची जयंती व पुण्यतिथी साजरी करतो. या निमित्ताने रक्तदान शिबिरासारखे समाजोपयोगी विधायक व रचनात्मक उपक्रम राबवल्यास उपयुक्त ठरू शकेल. प्रत्येकाने स्वतःची जबाबदारी व जाणीव ओळखून सामाजिक बांधिलकी जोपासली, तर समाजासोबत स्वतःचीही उन्नती होते. रक्त संक्रमणामुळे बर्याच लोकांचे व रुग्णांचे प्राण वाचू शकतात. त्यामुळे लोकांनी रक्तदानासाठी पुढे आले पाहिजे. रक्ताची गरज लक्षात घेऊन स्वयंसेवी संस्था, संघटनांनी रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यासाठी पुढे आले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.
माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी स्वत: पुढाकार घेऊन महाराष्ट्रात सर्वप्रथम कोपरगाव येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा दिमाखदार पूर्णाकृती पुतळा व भव्य स्मारक उभारले. त्यानंतर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अण्णाभाऊंचे पुतळे उभारले गेले. स्व. शंकरराव कोल्हेसाहेब व बिपीनदादा कोल्हे यांनी मातंग समाजाचे विविध प्रश्न सोडवून त्यांना न्याय मिळवून दिला. मातंग समाजातील महिलेला कोपरगावच्या नगराध्यक्षपदी काम करण्याची संधी दिली. कोल्हे कुटुंबीय कायमच मातंग समाजबांधवांच्या पाठीशी उभे असल्याचे त्या म्हणाल्या.
यावेळी भाजपचे शहराध्यक्ष डी. आर. काले, माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, विनोद राक्षे, माजी उपनगराध्यक्ष रवींद्र पाठक, स्वप्नील निखाडे, विजय आढाव, शिवसेना नेते कैलास जाधव, भाजयुमोचे शहराध्यक्ष अविनाश पाठक, रिपाइंचे नेते दीपक गायकवाड, माजी नगरसेवक जनार्दन कदम, दिनेश कांबळे, शिवाजीराव खांडेकर, जितेंद्र रणशूर, गोपीनाथ गायकवाड, राजेंद्र बागुल, रवींद्र रोहमारे, जयेश बडवे, सोमनाथ म्हस्के, उत्तमराव सोळसे, शरद त्रिभुवन, सुखदेव जाधव, बाळासाहेब सोळसे, अर्जुन मरसाळे, सुरेश मरसाळे,
सुजल चंदनशिव, रवींद्र शेलार, संदीप निरभवणे, दीपक जपे, अल्ताफभाई कुरेशी, खालिकभाई कुरेशी, फकीर मोहम्मद पैलवान, सद्दामभाई सय्यद, बाळासाहेब जोशी, हाशमभाई शेख, सतीश रानोडे, शंकर बिऱ्हाडे, अनिल जाधव, जगदीश मोरे, सुजल चंदनशिव, राजेंद्र साळवे, प्रभुदास पाखरे, रवींद्र पोळ, सतीश साबळे, उद्धवशेठ विसपुते, नसीरभाई सय्यद, दिलीप तुपसैंदर, संजय तुपसैंदर, विक्रांत सोनवणे, विजय चव्हाणके, सिद्धांत सोनवणे, संतोष साबळे आदींसह भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.