मतदार संघातील जनतेच्या सुखासाठी आमदार काळेंची साई चरणी प्रार्थना

Mypage

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ०४ : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आ. आशुतोष काळे यांनी वाढदिवसानिमित्त साईबाबांचे दर्शन घेऊन, मतदार संघातील जनता नेहमी सुखी राहावी, अशी साईबाबा चरणी विनम्र प्रार्थना केली आहे.

Mypage

मतदारसंघातील ज्या जनतेच्या आशीर्वादाने मतदार संघाच्या विकासासाठी मागील साडेतीन वर्षाच्या काळात २१०० कोटी रुपयांचा निधी मिळवला. ती मायबाप जनता कायमची सुखी राहावी यासाठी त्यांनी वाढदिवसाच्या दिवशी पहाटे साईबाबांचे दर्शन घेऊन त्यांच्या चरणी प्रार्थना केली.

Mypage

कोपरगाव मतदार संघाच्या विकासाची गाडी आमदार आशुतोष काळे यांनी रुळावर आणून रस्ते, वीज, पाणी, आरोग्य अशा मूलभूत गरजा सोडविल्या आहेत. यामध्ये अत्यंत कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी पाच नंबर साठवन तलावाचे अशक्यप्राय स्वप्न सत्यात उतरून साठवन तलावाचे काम आज प्रगतीपथावर आहे.

Mypage

लवकरच कोपरगाव प्रगतीपथावर असेल, त्यामुळे फक्त बोलायचं नाही, तर करून दाखवायचे ही आ. आशुतोष काळे यांची वृत्ती आहे. त्यासाठी प्रयत्न जरी त्यांचे असले तरी प्रेरणा आणि आशीर्वाद मात्र मतदार संघातील जनतेचे आहेत. त्यामुळे मतदार संघातील जनता नेहमी सुखी राहावी यासाठी साई चरणी प्रार्थना केली.

Mypage

आपल्या नेतृत्वाचा आदर्श घेवून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मतदार संघातील हजारो कार्यकर्त्यांनी आ. आशुतोष काळे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवून मोठ्या उत्साहात साजरा केला. अनेक ठिकाणी वृक्षारोपण, विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप, कोपरगाव शहरातील विविध प्रभागांमध्ये, जंतुनाशक फवारणी असे अनेक सामाजिक उपक्रम राबवून वाढदिवस साजरा केला.

Mypage