कोपरगाव प्रतिनिधी, दि, २५ : वैजापूर येथे सुरु असलेल्या सदगुरु गंगागिरी महाराज यांच्या २७६ व्या अखंड हरिनाम सप्ताहसाठी कोळपेवाडी ग्रांमस्थाच्या वतीने २१ क्रेट भाकरी शुक्रवारी रवाना करण्यात आल्या.
योगिराज सदगुरु श्री गंगागिरी महाराज गोदावरी धाम सरला बेट यांच्या २७६ व्या अखंड हरिनाम सप्ताह वैजापूर येथे सुरु असुन सप्ताहाच्या पाचव्या दिवशी कोळपेवाडी ग्रांमस्थाच्या वतीने २१ क्रेट भाकरी, एक गोडेतेल डबा, रोख साडे सहा हजार रुपये सप्ताह स्थळी सिध्देश्वर देवस्थान सेवेकरी परशुरामगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली वैजापूर येथे रवाना करण्यात आले.
यावेळी निवृत्ती अण्णा कोळपे, नथुभाऊ कचारे, रामदास कोळपे गंगा कोळपे, मच्छिंद्र कोळपे, प्रकाश कोळपे, लहु कुंदलके, भाऊसाहेब कोळपे, जनार्दन कोळपे, शिवाजी ढोणे, दत्तात्रय शिंदे आदी ग्रामस्थ यावेळी उपस्थित राहून भाकरीच्या प्रसादाचे वाहन सप्ताह स्थळी रवाना केले.