कोपरगावमध्ये दोन गटात मारामारी, १७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल, पोलिसांनी केला लाठीचार्ज

कोपरगाव प्रतिनिधी दि. २८ : शहरातील गांधीनगर भागात किरकोळ कारणावरून दोन गटातील जमावाने एकमेकासमोर येवून लोखंडी गज, लाकडी दांडके, दगड व विटाचा वर्षाव करून जीवघेणे हल्ले करून तुंबळ मारामारी केली. यामध्ये शीतल सुनील पगारे रा. इंदिरानगर हि महिला जखमी झाली असून त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालय येथे उपचार करण्यात आले.

घटनेची माहिती पोलिसांना कळताच पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख, सहायक पोलीस निरीक्षक महेश येसेकर यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल होऊन हाणामारी करणाऱ्यावर सौम्य लाठीचार्ज करुन तणावग्रस्त परिस्थिती नियंत्रणात आणली.

रविवार मध्यराञी दहा ते पावने आकरा या दरम्यान दोन गट अचानक आमनेसामने आले. दारु पिण्यावरुन झालेल्या किरकोळ वादाचे रुपांतर दोन समुहात झाले. एकमेकांना खुन्नस देत तुंबळ मारामारी सुरु झाली. यात एक महिला जखमी झाली. बराच वेळ सामुदायिक ठिकाणी मारामारी करणाऱ्यावर पोलीस कर्मचारी प्रवीण अंकुश घुले यांच्या फिर्यादीवरून एजाज सलीम शेख, साहिल गुलाब शेख, इरफान शकील शेख, ऋतिक कुऱ्हाडे, वैभव मुकेश कुऱ्हाडे, चेतन जाधव, कुणाल भंडारी, पवन रोकडे, गुडी उर्फ विशाल वाडेकर, सलीम लतीफ शेख, किरण शिवलाल लहिरे, फैसल कागद शेख, अबूशाबान पठाण, गुलाब सांडू शेख, नकुल धर्मराज ठाकरे, अजय पाटील भुऱ्या उर्फ करण गायकवाड या १७ जणांसह इतर चार ते पाच अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तर पाच जनांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. इतर दंगा करणाऱ्यांचा शोध सुरु आहे.  घटनेबाबत पोलिसांशी संपर्क साधला असता ते म्हणाले, कोपरगाव शहरात या पुढे कोणाचीही ददिगिरी खपवून घेतली जाणार नाही. सार्वजनिक ठिकाणी दहशत पसरविणाऱ्याचा जागेवर बंदोबस्त केला जाणार आहे.

तसेच या झालेल्या मारहाणी मध्ये फरार आरोपींचा सीसीटीव्हीच्य माद्ध्यामातून शोध घेऊन गुन्हे दाखल करण्यात येणार आहे. त्यामुळे या मारामारी मध्ये आरोपींची संख्या आणखीवाढण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवल्यामुळे सार्वजनिक ठिकाणी दंगा करणाऱ्यांच्या पाठीमागे पोलिसांचा ससेमिरा लागला आहे. पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख हे सध्या एक्शन मोडवर असल्याने शहरामध्ये गुंडागर्दी करणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर आहे.