शेवगाव प्रतिनिधी, दि २ : मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याचा कॉल करणाऱ्या आरोपीस शेवगाव पोलिसांनी तातडीने चतूर्भज केले आहे. यासंदर्भात थोडक्यात माहिती अशी की, काल गुरुवारी दुपारी अडीचच्या दरम्यान तालुक्यातील हसनापूर येथील बाळकृष्ण भाऊसाहेब ढाकणे हल्ली रा. शास्त्रीनगर शेवगाव याने ११२ एमडीटी वर आपल्या मोबाईल वरून मंत्रालयात बॉम्ब ठेवला आहे म्हणून मुख्यमंत्र्यांशी बोलायचे आहे, असा कॉल करून नागरिकांच्या सोयीसाठी असलेल्या ११२ प्रणालीचा दुरुपयोग होईल अशा हेतूने, पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी कॉल करून सार्वजनिक सुरक्षिततेस बाधा येईल असे कृत्य केले.
हा आरोपी शेवगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहण्यास असल्याचे परिविक्षाधीन आयपीएस अधिकारी बी. चंद्रकांत रेड्डी यांना समजताच त्यांनी दोन पथके तयार करून तासाच्या आत आरोपीचा स्वतः पथकासह शोध घेऊन त्यास चतुर्भूज केल.
आरोपीने पाथर्डी मधून फोन केला असल्याने त्यास पाथर्डी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. आरोपी विरुद्ध पाथर्डी पोलीस ठाण्यात विविध कलमाअंतर्गत पोलीस नाईक निलेश म्हस्के यांनी गुन्हा दाखल केला आहे.
ही कामगिरी पोलिस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांचे मार्गदर्शनाखाली शेवगावचे प्रभारी बी चंद्रकांत रेड्डी भा .पो.से . पोस ई निरज बोकील, पोना सुधाकर दराडे, रवी शेळके, सुजित सरोदे, सुभाष खिळे, ज्ञानेश्वर सानप, संतोष वाघ, बाप्पासाहेब धाकतोडे यानी केली.