घारी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी काळे गटाच्या ठकुबाई काटकर बिनविरोध

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १८ : कोपरगाव तालुक्यातील घारी ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच रामदास जाधव यांनी रोटेशन पद्धतीने आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी निवडणूक अधिकारी पोहेगावचे मंडलाधिकारी प्रताप कळसे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली असून सरपंच पदासाठी आ. आशुतोष काळे गटाच्या सौ. ठकुबाई रामकिसन काटकर यांचा एकमेव अर्ज आल्यामुळे निवडणूक अधिकारी प्रताप कळसे यांनी सौ. ठकुबाई काटकर यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. यावेळी काळे गटाचे सरपंच व सदस्यांनी अविनाश खरात यांना एकमताने उपसरपंच पदासाठी सहमती दर्शविली.

                 नवनिर्वाचित सरपंच सौ. ठकुबाई काटकर यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले की, आ. आशुतोष काळे यांनी माझ्यावर टाकलेल्या विश्वासाला तडा जावू न देता सर्व सदस्यांना सोबत घेवून घारी गावचा सर्वांगीण विकास करून टाकलेला विश्वास सार्थ ठरवणार असल्याचे सांगितले. सरपंच सौ. ठकुबाई काटकर यांचे माजी आमदार अशोकराव काळे व आ. आशुतोष काळे यांनी अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.  

यावेळी काळे गटाचे माजी सरपंच रामदास जाधव, सदस्य संदिप पवार, अविनाश खरात, सौ.कृष्णाबाई पवार यांच्यासह संदीप पवार,कृष्णाबाई पवार, रामदास जाधव,शिवाजी जाधव, अविनाश पवार, किरण पवार, लक्ष्मण पवार, यमाजी पवार, विजय पवार, सतीश पवार, संदीप पवार, सौरभ पवार, रामकिसन काटकर, हिरामण त्रिभुवन, भानुदास होन, माऊली पवार, अनिल पवार, राजकिशोर जाधव, सुनील पवार, अशोक जाधव, वसीम पठाण, शिवाजी बर्डे, अक्षय झाल्टे, महेश काटकर, किशोर पवार, कमलाकर जाधव, अनिल गोधडे, सुहास पवार, संजय गोधडे, अरुण आहेर, सुनील पवार, संजय पवार, 

नारायण पवार, कांतीलाल पवार, सचिन जाधव, शरद पवार, भाऊसाहेब खरात, गणेश पवार, कर्णा पवार, रंगनाथ पवार, सुभाष चव्हाण, रफीक पठाण, भाऊसाहेब कांबळे, रोहिदास पवार, मच्छिंद्र खरात, संपत खरात, प्रताप गायकवाड, श्याम नवले, गणेश दरेकर, संदीप नवले, अशोक पवार, विरेश पवार, लक्ष्मण जाधव, शांतीलाल पवार, गुलाब पठाण, अभिषेक गायकवाड, प्रताप शिलेदार, परमानंद होन राजकिशोर जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी ग्रामपंचायत सदस्य व कार्यकर्त्यांनी नवनिर्वाचित सरपंच सौ. ठकुबाई काटकर यांचे अभिनंदन करून गुलाल उधळून आपला आनंद व्यक्त केला.

आ.आशुतोष काळे यांनी मतदार संघाच्या विकासासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी देवून मतदार संघाचा कायापालट केला. मतदार संघातील प्रत्येक गावाच्या विकासाचे प्रश्न मार्गी लावून घारी गावाच्या विकासासाठी देखील निधी देवून अनेक विकास कामे कायमची सोडविली आहेत.त्यामुळे घारी गावातून आ. आशुतोष काळे यांना २०१९ च्या विधानसभा  निवडणुकीत ८० टक्के मतदान करण्याचा घारी ग्रामस्थांनी निर्धार केला आहे.