नितिनदादा कोल्हे यांचा वाढदिवस रक्तदान शिबीर व वक्तृत्व स्पर्धेने साजरा

कोपरगांव प्रतिनिधी, दि. १८ : राष्ट्रीय पातळीवर वेगवेगळे कीर्तिमान स्थापित केलेल्या संजीवनी ग्रुप इन्स्टिटयूट संचलित संजीवनी इंजिनिअरींग कॉलेज, फार्मसी, पॉलीटेक्निक, एमबीए, आदी संस्थांचे अध्यक्ष नितिनदादा कोल्हे यांच्या ७१ व्या वाढदिवसा निमित्ताने संजीवनी शैक्षणिक संकुलाच्या मुख्यालयात आज भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

संजीवनी सैनिकी स्कूल अँड  ज्युनिअर कॉलेजच्या वतीने संजीवनी शैक्षणिक संकुलातील सर्व शाळा व महाविद्यालयांमधिल विध्यार्थ्यांसाठी विविध विषयांवर भव्य वत्कृत्व स्पर्धा आयोजीत करण्यात आली होती, अशी माहिती संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या अधिकृत सुत्रांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.

जीवनी इंजिनिअरींग कॉलेज अँड एमबीए, संजीवनी फार्मसी महाविद्यालय व संजीवनी के.बी.पी.पॉलीटेक्निक या संस्थांच्या राष्ट्रीय  सेवा योजना (एन.एस.एस.) अंतर्गत एन.एस.एस. चे समन्वयक अनुक्रमे प्रा. एन.एस. सुरनर, प्रा. ऋषिकेश जगझाप व प्रा. गणेश  चांगण यांच्या देखरेखित रक्तदान शिबिरात १७५ रक्त पिशव्या संकलित करण्यात आल्या. विध्यार्थ्यांचा रक्तदानासाठी प्रचंड उत्साह दिसुन आला परंतु रक्त संकलनाच्या मर्यादा होत्या. संजीवनी ब्लड बॅन्कच्या संचालिका सौ. नीता पाटील यांच्या टीमने रक्त संकलाचे कार्य केले.

        तसेच संजीवनी सैनिकी स्कूल व ज्यु. कॉलेजने सध्याच्या काळात दयाळुपणाचे महत्व, पर्यावरण संवर्धन व सहकार महर्षि  स्व. शंकरराव  कोल्हे-एक योध्दे या विषयांवर वत्कृत्व स्पर्धा घेतली. या स्पर्धेसाठी प्रथम बक्षिस रू ११११, दुसरे बक्षिस रू ७०१ व तिसरे बक्षिस रू ५०१ असे ठेवण्यात आले आहे. तसेच रू २०१ चे उत्तेजनार्थ एक बक्षिस ठेवण्यात आले आहे. या स्पर्धा डायरेक्टर (नॉन अकॅडमिक) डी. एन. सांगळे , प्राचार्य डॉ. बी. जी. गायकवाड, उपप्राचार्य प्रा. कैलास दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडल्या.

           रक्तदान शिबिरा दरम्यान मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे, विश्वस्त सुमित कोल्हे, चिफ टेक्निकल आफिसर विजय नायडु, प्रशाकीय  अधिकारी प्रकाष जाधव, सर्व संस्थांचे डायरेक्टर डॉ. ए.जी.ठाकुर, डॉ. विपुल पटेल, प्राचार्य डॉ. राजन षेंडगे,  प्राचार्य ए. आर. मिरीकर, प्राचार्य डी. एन. पाटील,  रजिस्ट्रार्स, आदींनी भेटी देवुन रक्त दात्यांची विचारपुस केली. तसेच नितिनदादा कोल्हे यांच्या चाहत्यांनी आपापल्या परीने ठिकठिकाणी विविध उपक्रमांनी त्यांचे अभिष्टचिंतन केले. तर आज दिवसभर नितिनदादा कोल्हे यांच्या चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.