वरखेड सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी भगवान तेलोरे बिनविरोध

शेवगाव प्रतिनिधी, दि. २० : तालुक्यातील मोठी आर्थिक उलाढाल व राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या अशा वरखेड विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्ष पदी भगवान संतराम तेलोरे यांची बिनविरोध निवड  झाली.

संस्थेचे आधीचे चेअरमन हनुमान पातळकळ यांची बाजार समितीच्या संचालक पदी निवड झाल्याने व रोटेशनची मुदत संपल्याने त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने चेअरमन पदासाठी संचालक मंडळाच्या झालेल्या विशेष बैठकीत भगवान तेलोरे यांचा चेअरम पदासाठी एकमेव अर्ज दाखल झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी सहाय्यक निबंध विजयसिंह लकवाल यांनी त्यांची बिनविरोध निवड जाहीर केली.

संस्थेचे सचिव अशोक काळे यांनी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. तेलोरे यांच्या नावाची सूचना बाजार समितीचे संचालक हनुमान पातकळ यांनी केली. संचालक रेवननाथ यांनी त्यास अनुमोदन दिले.

नूतन चेअरमन तेलोरे यांचा पंचायत समितीचे माजी सदस्य मंगेश थोरात यांच्या हस्ते बाजार समितीचे संचालक मनोज तिवारी यांच्या प्रमुख उपस्थितीत सन्मान करण्यात आला. सरपंच परमेश्वर तेलोरे मोहनराव शिरसाट यांच्यासह पांडुरंग तेलोरे गोरख पातकळ, विकास शिरसाट, संदीप तेलोरे, सोमनाथ काळे, योगेश सोनवणे, रामकिसन तेलोरे आदींसह  संस्थेच्या संचालक मंडळाचे सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

संस्थेचे नूतन चेअरमन तेलोरे यांचे आमदार माजी आमदार डॉक्टर नरेंद्र पाटील घुले, माजी आ.चंद्रशेखर घुले, पंचायत समितीचे माजी सभापती  डॉ.क्षितिज घुले, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष कल्याण नेमाने, राष्ट्रवादी युवकचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय कोळगे, बाजार समितीचे सभापती एकनाथ कसाळ, उपसभापती गणेश खंबरे आदींनी अभिनंदन केले आहे.