शेवगाव वकील संघाच्या अध्यक्ष व उपाध्यक्षाची निवड

शेवगाव प्रतिनिधी, दि. २२ : शेवगाव तालुका वकील संघाचे अध्यक्ष कारभारी गलांडे यांची तसेच त्याच्या अन्य पदाधिकाऱ्यांची मुदत संपल्याने त्यांनी राजीनामा दिल्याने निवडणूक निर्णय अधिकारी ॲड. डी.बी. आधाव यांनी बोलाविलेल्या वकिल संघाच्या बैठकीत ॲड. रामदास बुधवंत यांची अध्यक्ष पदी, ॲड. विजय भेरे यांची उपाध्यक्षपदी, ॲड. संभाजी देशमुख यांची सचिव पदी तर ॲड. अविनाश शिंदे यांची खजिनदार पदी बहुमताने निवड करण्यात आली.

निवडी नंतर वकील संघाचे माजी अध्यक्ष कारभारी गलांडे, ॲड. सुभाष लांडे, ॲड. विनायक आहेर, ॲड. द्वारकानाथ बटूळे, ॲड. अर्जुन जाधव, ॲड. अमोल वेलदे, ॲड. गणेश ताठे, ॲड. अशोक गांधी आदिच्या हस्ते सर्वाचा सत्कार करण्यात आला.