कोपरगाव प्रतिनिधी, दि. २५ : आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगाव मतदार संघाच्या विकासासाठी केलेल्या चौफेर कामगिरीमुळे मतदार संघातील अनेक गावातील कार्यकर्ते आ.आशुतोष काळे यांच्या कामावर प्रभावित होवून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात सातत्याने प्रवेश करीत आहेत.
याचीच पुनरावृत्ती सोमवार (दि.२५) रोजी पुन्हा झाली आहे. यावेळी मतदार संघातील राहाता तालुक्यातील शिंगवे गावातील असंख्य भाजपच्या कार्यकर्त्यांनी पक्षाला रामराम करून आ. आशुतोष काळे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. .
यामध्ये गणेश काळे, सचिन काळे, पोपटराव काळे, रमेश काळे, विजय काळे, बाबासाहेब बाभूळके, योगेशजी सालपुरे, चांगदेव काळे, संतोष काळे, विजय बरवंट, सुखदेव जाधव, रविंद्र सालपुरे, मच्छिन्द्र बरवंट, तन्मय बरवंट, अनिल बरवंट, महेश काळे, विकास बरवंट, अमोल शिंदे, गोरख जाधव, लक्ष्मण थोरे, नितीन काळे या भाजपच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला.
यावेळी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुरेश जाधव, पद्माकर सुराळकर, ज्ञानदेव चौधरी, बाळासाहेब बाभूळके, प्रमोद चौधरी, बाबासाहेब पवार, पोपटराव चौधरी आदी उपस्थित होते.