सिंजेंटाचा मका तणावमध्ये सुद्धा असरदार

कोपरगाव प्रतिनिधी, दि.१९ : सिंजेटा इंडिया प्राइवेट लिमिटेड यांच्या संयुक्त वतीने शिंगवे येथे शेतकरी बांधवांसाठी मका पीक प्रात्यक्षिक व विहित चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात शेतकरी बांधव ही मोठ्या संख्येने उपस्थित होते सिंजेंटा ही कंपनी गेल्या कित्येक वर्षापासून उच्च प्रतीची बियाणे तयार करत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात भरघोस वाढ होऊन शेतकऱ्यांना त्याचा फायदा होत आहे त्यामुळे सिंजेंटा ही कंपनी शेतकऱ्यांच्या विश्वासाचे प्रतीक बनली आहे.

सोबत यावर्षी सिंजेंटा वाण NK 6540, Nk6802, Nk7328 हे वाण शेतकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. प्रगतशील शेतकरी संजय एकनाथ सुरळकर शिंगवे यांच्या शेतावर मक्का वाण NK 6540 या वाणा वर पीक प्रात्यक्षिक कार्यक्रम पार पडला या वाणाविषयी कंपनी प्रतिनिधी अभिषेक पाटील कोपरगाव यांनी NK 6540 या वाणाची वैशिष्ट्ये व खत पाणी व्यवस्थापन कसे करावे याची माहिती दिली.

या वाणाची वैशिष्ट्ये कोरडवाहू शेती साठी उत्पन्नाचा भरवसा टोकापर्यंत भरले एकसमान आकाराची कणसे अनियमित पावसात पण उत्पादनचे आश्वासन ही वैशिष्ट्ये सांगितली व मका पिकाच्या उत्पन्नात वाढ होण्यासाठी कोणत्या प्रकारची खते वापरावी याचेही योग्य पद्धतीने मार्गदर्शन केले, एकरी उत्पन्न कसे काढावे याची माहिती दिली व शेतकरी संजय एकनाथ सुराळकर यांना एकरी ३९.३२ क्विंटल पर्यंत उत्पन्न निघेल असे कंपनीत प्रतिनिधींनी यांनी सांगितले.

अंकुर कृषी सेवा केंद्र कोपरगांव, लोहकणे पाटील कृषी सेवा केंद्र व प्रगतशील शेतकरी बाळासाहेब सुरळकर, निलेश चौधरी, सोपान पाटील,शिवाजी भांगरे, प्रशांत काळे, रघुनाथ सुरळकर, दुशिंग साहेब ,जयेश सुरळकर, जावेद शेख, पोपट सुरळकर, रंजना गुंजाळ, अशोक नळे, प्रमोद सुरळकर, संजय लांडगे, इंदुबाई सुरळकर, सिंदुबाई सुरळकर, कांता सुरळकर, गायत्री पाटील, कावेरी सुरळकर, प्राजक्ता सुरळकर, मयूर सुरळकर, एकनाथ सुरळकर, कुलकर्णी साहेब व आदी शेतकऱ्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.