कोपरगाव प्रतिनिधी, दि.२३ : देशाच्या पतसंस्था चळवळीत महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्हा केंद्रबिंदू असून नगर जिल्ह्यातील पतसंस्था चळवळीला सहकाराची ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. सामान्य व्यक्तीला पत निर्माण करून देण्याचे महत्वाचे काम पतसंस्था करीत असून राज्य फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे करत असलेल्या कामामुळे महाराष्ट्रातील पतसंस्था चळवळीला ऊर्जितावस्था प्राप्त होत आहे. तसेच राज्यातील पतसंस्था चळवळीच्या विविध प्रश्नांचा केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्याकडे पाठपुरावा करून ते सोडविणार असल्याची ग्वाही महाराष्ट्र राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिली.
अहमदनगर जिल्हा पतसंस्था स्थैर्यनिधी सहकारी संघ व महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन आयोजित अहमदनगर जिल्ह्यातील नागरी सहकारी, पगारदार सहकारी, महिला नागरी व मल्टीस्टेट सहकारी पतसंस्थांच्या मेळाव्यात जिल्ह्यातील आदर्शवत काम करणाऱ्या सहकारी पतसंस्थांना ‘सहकार समृद्ध पुरस्कार’ व पतसंस्था चळवळीत युवकांनी केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल ‘युवा प्रोत्साहन पुरस्कार’ वितरण आणि अहमदनगर जिल्हा सहकारी पतसंस्थांची संख्यात्मक आकडेवारीचे विश्लेषण असलेल्या पुस्तिकेचे प्रकाशन अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या हस्ते शिर्डी येथील स्व.पद्मश्री विठ्ठलराव विखे सभागृहात करण्यात आले.
विखे पुढे म्हणाले की, बुलढाणा अर्बन पतसंस्था संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक यांच्या नेतृत्वात वेअर हाऊस बांधून शेतकऱ्यांच्या उत्पादीत केलेल्या मालाची नासाडी रोखून त्यांना वेळेवर अधिक किंमत मिळवून देत असून महाराष्ट्रातील पतसंस्थांना दिशादर्शक असल्याचे सांगत बुलढाणा अर्बन पतसंस्थेचा आदर्श घेण्याचे आवाहन केले.
प्रसंगी मनोगत व्यक्त करताना राधेश्याम चांडक तथा भाई म्हणाले की, भारतात अन्नधान्य वाया जाण्याचे प्रमाण हे मोठे आहे. त्यामुळे सहकारी पतसंस्थांच्या माध्यमातून गोदाम योजना राबवण्यात शासनाने पतसंस्थांना प्रोत्साहन द्यावे. तसेच अहमदनगर जिल्हा स्थैर्यनिधीचे अध्यक्ष सुरेश वाबळे म्हणाले की, अहमदनगर जिल्ह्याला सहकाराची मोठी परंपरा आहे. परंपरा टिकविण्याचे काम अहमदनगर जिल्हा सहकारी पतसंस्था स्थैर्यनिधीच्या माध्यमातून आम्ही करत आहोत.
जिल्ह्यातील साई आदर्श को-ऑप. क्रेडिट सोसायटी (राहुरी), सिद्धिविनायक नागरी सहकारी पतसंस्था (श्रीरामपुर), गुरुदेव गुरुदेव डॉ. काटे स्वामी पतसंस्था (श्रीरामपूर), मियासाहेब ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था (राहुरी), अंबिका महिला नागरी सहकारी पतसंस्था (श्रीरामपुर), गुरुदेव दत्त नागरी सहकारी पतसंस्था (गणेश नगर), श्री साई नागरी सहकारी पतसंस्था (शिर्डी), ज्योती नागरी सहकारी पतसंस्था (कोपरगाव), संत नागेबाबा ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था (भेंडा), पोहेगाव ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था (कोपरगाव), समता ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था (कुकाणा),
राहुरी तालुका डॉ. केमिस्ट सहकारी पतसंस्था (राहुरी), विठाई ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था (श्रीगोंदा), दूधगंगा ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था (अकोले), जैन ओस्तवाल पंचायत सहकारी पतसंस्था (अहमदनगर), महालक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था (श्रीरामपुर), जनसेवा ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था (बेलापूर), मार्कंडेय नागरी सहकारी पतसंस्था (अहमदनगर), महेश नागरी सहकारी पतसंस्था (श्रीरामपुर), सुदर्शन नागरी सहकारी पतसंस्था (श्रीरामपुर), सद्गुरु महाराज चौरे सहकारी पतसंस्था (टाकळीमिया),
श्री स्वामी समर्थ पतसंस्था (पाथर्डी), शिवांकुर अर्बन को-ऑप.क्रेडिट सोसायटी (राहुरी), लोकहित महिला नागरी सहकारी पतसंस्था (श्रीगोंदा), राघवेश्वर ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था (कोपरगाव) यांना ‘सहकार समृद्ध पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. तर ‘युवा प्रोत्साहन पुरस्कार’ सागर सोमनाथ तनपुरे (राहुरी), वसंत बाबजी कवाद (निघोज), नमिता ठुबे (कान्हूर पठार), राजेंद्र निवृत्ती कोळपे (कोळपेवाडी), नितीन शंकर चासकर (अकोले), दत्तात्रय सोनबा गावडे (काष्टी), डॉ.स्वाधीन किसनराव गाडेकर (राहाता) यांना देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन राज्य फेडरेशनच्या सीईओ सुरेखा लवांडे यांनी केले. प्रास्ताविक स्थैर्यनिधी संघाचे उपाध्यक्ष वसंत लोढा यांनी केले. यावेळी महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे, संचालक वासुदेव काळे, जिल्ह्यातील पतसंस्थांचे प्रतिनिधी, पतसंस्था चळवळीतील कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. उपस्थितांचे आभार आदर्श पतसंस्थेचे चेअरमन शिवाजी आप्पा कपाळे यांनी मानले.