कोपरगाव प्रतिनिधी, दि. २४ : दिवाळीच्या खरेदीला कोपरगाव तालुक्यातील नागरिकांनी स्थानिक बाजारपेठेतच खरेदी करावी व व्यापाऱ्यांनी देखील माफक दर व ग्राहकांना चांगली सेवा द्यावी असे आवाहन आमदार काळे यांनी केले आहे. वर्षभरात येणाऱ्या अनेक सणांपैकी दिवाळी सणाचे लहान थोरांना सर्वानाच मोठे आकर्षण असते. जवळपास आठवडाभर दिवाळी सणाची धूमधाम सुरु असते. त्यासाठी करण्यात येणाऱ्या पूर्वतयारीसाठी रांगोळी, आकाश कंदील, कपडे, खाद्य पदार्थ, गृहोपयोगी वस्तूंची मोठ्या प्रमाणात खरेदी होते. त्यामुळे बाजार पेठेत मोठ्या प्रमाणात गर्दी होवून आर्थिक उलाढाल वाढते.
पार्श्वभूमीवर कोपरगाव शहराच्या बाजार पेठेची आर्थिक उलाढाल वाढून अर्थकारणाला चालना मिळावी यासाठी आ. आशुतोष काळे यांनी कोपरगाव शहरातील व्यापारी बांधवांची बैठक घेवून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. कोपरगाव शहरातील विकासाच्या समस्या बहुतांश स्वरूपात मार्गी लागल्यामुळे कोपरगाव शहरात दैनंदिन खरेदीसाठी ग्रामीण भागातील नागरिकांची वाढलेली गर्दी समाधानकारक असून त्यामुळे बाजारपेठ पुन्हा फुलली आहे. परंतु हि गर्दी दिवाळी सणाच्या खरेदीसाठी देखील होणे अत्यंत गरजेचे आहे.
यावर्षी दुष्काळी परिस्थिती असून शेतकरी वर्ग अडचणीत आहे. मात्र, कितीही अडचण असली तरी शेतकरी दिवाळी सण साजरा करतात. त्यामुळे व्यवसायिकांनी देखील दुष्काळजन्य परिस्थितीचा विचार करून जास्तीचा नफा न कमविता माफक दरात आपल्या मालाची विक्री करून ग्राहकांना चांगली सेवा द्यावी.- आमदार काळे.
अनेक नागरिक खरेदीसाठी शेजारच्या तालुक्यात जातात. त्यामुळे वेळ आणि खर्च वाढतो व छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांनी ग्राहक खरेदीसाठी येईल या भरोशावर खरेदी केलेल्या मालाची अपेक्षित विक्री होत नसल्यामुळे व्यापाऱ्यांचे नुकसान होते. त्यासाठी नागरिकांनी स्थानिक बाजार पेठेतच खरेदी करावी जेणेकरून कोपरगाव तालुक्यातील पैसा कोपरगाव तालुक्यातच राहून बाजारपेठेतील अर्थव्यवस्थेला गती मिळेल.
कारखान्याच्या कर्मचाऱ्यांनी देखील दिवाळीची खरेदीसाठी इतर तालुक्यात न जाता स्थानिक बाजारपेठेतच खरेदी करावी यासाठी कर्मचाऱ्यांना आवाहन करू असे आ. आशुतोष काळे यांनी यावेळी सांगितले. यावेळी चैताली काळे यांनी देखील व्यापारी बांधवांशी संवाद साधला. नागरिकांना स्थानिक बाजारपेठेतच दिवाळी सणाची खरेदी करण्याचे आवाहन करून स्वत: त्याची प्रत्यक्षात कृती करतांना आ. आशुतोष काळे यांनी पत्नी जिल्हा सहकारी बँकेच्या माजी संचालिका चैताली काळे यांच्या समवेत प्रत्यक्ष खरेदी देखील केली आहे.
यावेळी सुधीर डागा, महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमचंद बागरेचा, मन्नु कृष्णाणी, दिपक विसपुते, सुनील बोरा, गुलशन होडे, प्रदीप साखरे, सचिन ठोळे, तिलक अरोरा, अनिकेत भडकवाडे, रोहित काले, शाम लोंगाणी, अनुप पटेल, सचिन भडकवाडे, संतोष भट्टड, संकेत पारखे, मिलिंद जोरी, जय बोरा, अतुल धाडीवाल, तरुण भुसारे, किरण शिरोडे, राहुल हंसवाल, उमेश वाणी, रोहित काले, विधित जोशी, अभिनंदन शिंगी, सोनी महावीर, धनंजय सावजी, ओंकार भट्टड, जयेश डागा,
वाल्मिक शुक्ला, प्रतिक पाटील, हर्षल कृष्णाणी, सेवासींग सहानी, नसिर पठाण, रविंद्र देवरे, माजी नगरसेवक गटनेते विरेन बोरावके, मंदार पहाडे, रमेश गवळी, कृष्णा आढाव, राजेंद्र वाकचौरे, फकीर कुरेशी, अजीज शेख, युवक शहराध्यक्ष नवाज कुरेशी, चंद्रशेखर म्हस्के, सुनील शिलेदार, बाळासाहेब रुईकर, प्रशांत वाबळे, मनोज नरोडे, शैलेश साबळे, ऋषीकेश खैरनार, सचिन गवारे, गणेश बोरुडे, गोरख कानडे, नारायण लांडगे, सागर लकारे आदींसह व्यापारी बांधव उपस्थित होते.