कोपरगाव प्रतिनिधी, दि.२८ : तालुक्यातील शेतकरी बांधवासाठी जिल्हा अधिक्षक, कृषी अधिकारी, अहमदनगर यांनी चालु रब्बी हंगामासाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियाना अंतर्गत प्रमाणित बियाणे वितरण कार्यक्रम जाहिर केला असुन त्यानुसार सहकाररत्न शंकरराव कोल्हे शेतकरी सहकारी संघ कोपरगाव येथे कृभको कंपनीचे १४० क्विंटल व महाबीजचे ७० क्विंटल हरबरा बियाणे शासन अनुदानावर विक्रीसाठी उपलब्ध असुन शेतक-यांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी केले आहे. ते म्हणाले की, या बियाण्यासाठी महाराष्ट्र शासनाने प्रती किलो २५ रूपये अनुदान जाहिर केले आहे.
शेतक-यांना अनुदान रक्कम वजा जाता ३० किलो हरबरा बियाणे १८०० रूपयांस उपलब्ध करून देण्यांत आले आहे. तर रब्बी हंगामासाठी २१७ क्विंटल गव्हाचे बियाणे आले. असुन ४० किलोची महाबीज गहु प्रती बॅग अनुदान वजा जाता ११२० रूपयास विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यांत आली आहे. तरी या योजनेचा जास्तीत जास्त शेतक-यांनी लाभ घ्यावा, विविध शासकीय कृषी बियाणे योजनांचा लाभ शेतक-यांना व्हावा यासाठी सहकाररत्न शंकरराव कोल्हे शेतकरी सहकारी संघ सदैव सहकार्य करत आहे.
त्याचप्रमाणे चालु दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता. सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याने शेतक-याना पशुधन जगविण्यासाठी मोफत चारा बियाणे उपलब्ध करून देण्याचा धाडसी निर्णय घेतला असुन एका लाभार्थी शेतक-यास एकरी १५ किलो चारा बियाणे मोफत दिले जाणार आहे. तरी याबाबत शेतक-यानी कारखान्याच्या शेतकी विभागाशी संपर्क साधुन या योजनेचा लाभ घ्यावा असेही ते म्हणाले.