निळवंडेच्या कालव्याला आले पाणी, पाच दशकापासूनचे स्वप्न पूर्ण – आमदार काळे

Mypage

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ०२ : नगर-नाशिक जिल्ह्यातील कोपरगाव, अकोले, संगमनेर, राहाता, राहुरी, श्रीरामपूर व सिन्नर या सात तालुक्यातील दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या १८२ गावांना वरदान ठरणाऱ्या व ६८,८४८ हजार हेक्टर क्षेत्राचा सिंचनाचा प्रश्न कायम स्वरूपी सोडविणाऱ्या निळवंडे कालव्यांच्या कामांना गती मिळावी यासाठी आ. आशुतोष काळे यांनी वेळोवेळी केलेला पाठपुरावा, अधिकाऱ्यांच्या वारंवार घेतलेल्या बैठका आणि अडचणीच्या वेळी केलेल्या मदतीतून अखेर निळवंडेच्या डाव्या कालव्याला गुरुवार (दि.०२) रोजी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन डॉ. मच्छिंद्र बर्डे यांच्या हस्ते पाटबंधारे विभागाचे उपकार्यकारी अभियंता विवेक लव्हाट, महेश गायकवाड, सहा. अभियंता कदम यांच्या उपस्थितीत नारळ फोडून पाणी सोडण्यात आले आहे.

Mypage

यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या जिरायती भागातील नागरिकांनी डी.जे.च्या तालावर ठेका धरत एकमेकांना पेढे भरवत आनंद व्यक्त केला. पाच दशकापासुनचे स्वप्न पूर्ण झाल्यामुळे कोपरगाव मतदार संघाच्या निळवंडे डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रातील नागरिकांनी आनंद व्यक्त करीत कालव्याचे पाण्यात उभे राहून आ. आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे.

Mypage

निळवंडे कालव्यांच्या कामांना गती देण्यासाठी निळवंडे समितीचे सदस्य असलेल्या मा.खा.कर्मवीर शंकररावजी काळे व माजी आमदार अशोकराव काळे यांनी देखील विरोधी पक्षाचा आमदार असतांना त्यांच्या कार्यकाळात निळवंडेच्या कामाला गती देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. निळवंडे कालवा कृती समिती व निळवंडेच्या त्या-त्या लाभक्षेत्रातील विद्यमान लोकप्रतिनिधी या नात्याने निळवंडे कालवे तातडीने पूर्ण व्हावेत यासाठी आ. आशुतोष काळे यांनी देखील देखील पाठपुरावा केला आहे.

Mypage

निळवंडे कालव्यांची चाचणी पूर्ण झाल्यामुळे कधी आपल्या गावात पाणी येते यासाठी लाभधारक क्षेत्रातील शेतकरी व नागरिक आस लावून बसले होते. याची जाणीव असल्यामुळे निळवंडे डाव्या कालव्याच्या अधिकाऱ्यांच्या वारंवार बैठका घेवून लवकरात लवकर डाव्या कालव्याचे पाणी लाभक्षेत्रात कसे पोहोचेल यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरु होते. त्या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून वर्षानुवर्ष दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या व चातकाप्रमाणे निळवंडेच्या पाण्याची वाट पाहणाऱ्या या जिरायती गावातील नागरिकांच्या चेहऱ्यावरचा आनंद माझ्यासाठी अलौकिक ठेवा असून मागील पाच दशकापासून प्रलंबित असलेला अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न सुटला असून हि निळवंडे डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रातील नागरिकांना दिवाळीची भेट आहे.- आ. आशुतोष काळे.

यावर्षी कोपरगाव मतदार संघात अतिशय कमी पाऊस झाल्यामुळे भविष्यात पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवणार होते. त्यामुळे १०० टक्के भरलेल्या निळवंडे धरणातून डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्राच्या गावातील बंधारे, साठवण तलाव, पाझर तलाव भरून घेतले तर प्रशासनाचा त्रास कमी होवून टँकर सुरु करण्याची वेळ टाळता येवू शकते या दूरदृष्टीतून आ. आशुतोष काळे यांनी निळवंडे डाव्या कालव्याच्या अधिकाऱ्यांची बैठक घेवून निळवंडे डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यासाठी येणाऱ्या अडचणी दूर करून ज्या ठिकाणी काम सुरु आहे त्या कामाला गती देण्याच्या सूचना केल्या होत्या.

Mypage

त्याचबरोब निळवंडे धरणातून डाव्या कालव्याचे पाणी कोपरगाव मतदार संघातील जिरायती भागातील कडी, मल्हारवाडी, डांगेवाडी, मनेगाव, रांजणगाव देशमुख, वेस, सोयेगाव, अंजनापूर, बहादरपूर, धोंडेवाडी, जवळके, शहापूर, बहादराबाद या तेरा गावात आणण्यासाठी पूर्व तयारी करताना बुजविण्यात आलेले ओढे, नाले आ. आशुतोष काळे यांच्या सहकार्याने उकरण्यात आली असून सिमेंट पाईप देखील उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे जलद गतीने या गावांमध्ये पाणी येण्यास मदत होणार आहे. चर, ओढे नाले, पाणी पुरवठा साठवण तलाव व छोट्या-मोठ्या बंधाऱ्यात हे पाणी साठविले जावून दुष्काळी गावातील भूजलपातळी वाढण्यास मोठी मदत होणार आहे. त्यामुळे काकडी, मल्हारवाडी, डांगेवाडी, मनेगाव,

Mypage

रांजणगाव देशमुख, वेस, सोयेगाव, अंजनापूर, बहादरपूर, धोंडेवाडी, जवळके, शहापूर, बहादराबाद तसेच मतदार संघातील राहाता, चितळी, धनगरवाडी, वाकडी या जिरायती गावातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. यावेळी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन डॉ. मच्छिंद्र बर्डे यांच्या हस्ते पाटबंधारे विभागाचे उपकार्यकारी अभियंता विवेक लव्हाट, महेश गायकवाड, सहा. अभियंता कदम यांच्यासह निळवंडेच्या डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रातील काकडी, मल्हारवाडी, डांगेवाडी, मनेगाव, रांजणगाव वेस, सोयेगाव, अंजनापूर, बहादरपूर, धोंडेवाडी, जवळके, शहापूरचे शेतकरी, नागरिक व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Mypage

पाणी प्रश्न हा काळे परिवारासोबत सावली सारखा राहणारा ‘सोबती’ असल्यामुळे स्व. कर्मवीर शंकरराव काळे साहेब, माजी आमदार अशोक काळे यांच्याप्रमाणे हक्काच्या पाण्याचा लढा मी देखील लढत आहे. त्यामुळे यावर्षी चुकीच्या समन्यायी पाणी वाटप कायद्याचा आधार घेवून गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्रात कमी पर्जन्यमान झाले असताना संकटकाळी परिस्थितीत जायकवाडीला पाणी सोडण्याचा निर्णय होवू नये यासाठी माजी आमदार अशोक काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वप्रथम उच्च न्यायालयात कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याच्या सभासदांच्या वतीने याचिका दाखल केलेली आहे. जायकवाडीला पाणी जावू द्यायचेच नाही यासाठी शासनदरबारी देखील मी पाठपुरावा करीत असून यश नक्की मिळेल याचा मला विश्वास आहे.-आ. आशुतोष काळे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *