बी. जी. उर्फ भिमराव ढगे यांचे निधन

कोपरगाव प्रतिनिधी, दि१८ :  सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या बायोगॅस विभागाचे माजी प्रमुख बी. जी. उर्फ भिमराव गणपत ढगे(६६) यांचे दि.१६ नोव्हेंबर २०२३ निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, सुन, नातवंडे, जावई असा परिवार आहे. सागर ढगे यांचे ते वडील होत.

कै. बी. जी. ढगे यांचा स्वामी समर्थ सेवेकरी म्हणून प्रत्येक धार्मीक कार्यात मोलाचा सहभाग होता. त्यांच्या पार्थीवावर राहाता तालुक्यातील डोहाळे येथे अंत्यसंस्कार करण्यांत आले याप्रसंगी मोठा जनसमुदाय उपस्थित होता.