हद्दवाढ भाग शहराला जोडणे ही माजी आमदार सौ.स्नेहलता कोल्हे यांनी आम्हाला दिलेली भेट – विष्णुपंत गायकवाड

कोपरगाव प्रतिनिधी, दि.२६ : कोपरगाव शहराला नव्याने जोडला गेलेला हद्दवाढ भाग शहराला जोडणे ही तत्कालीन आमदार सौ.स्नेहलता कोल्हे यांनी आम्हाला दिलेली भेट असून अनेक पिढ्यांच्या विकसित भविष्याच्या बाबतीत घेतलेला तो ऐतिहासिक निर्णय ठरला आहे. कोणताही ग्रामीण भाग हा शहराला जोडल्या नंतर त्याचा विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी शासनाला निधी देणे बंधनकारक असते त्या प्रमाणे अनेक अंतर्गत रस्ते आणि विकासकामे यासाठी कोल्हे यांच्या दूरदृष्टीने निधी उपलब्धता होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अशी प्रतिक्रिया हद्दवाढ भागातील रहिवासी नागरिक विष्णुपंत गायकवाड यांनी दिली आहे.

ओमनगर, देवकर प्लॉट, गोकुळनगरी, सह्याद्री कॉलनी, द्वारकानगरी, कर्मवीरनगर, शंकरनगर, गवारे नगर, दुल्हनबाई वस्ती, देवकर प्लॉट, धोंडीबा नगर, आदिनाथ सोसायटी, ब्रिजलाल नगर यासह परिसरातील भाग कोपरगाव ग्रामीण व कोपरगाव शहर असा दोन टप्प्यावर विभागला गेलेला होता. त्यावर माजी आमदार स्न्हेहलता कोल्हे यांनी मोठ्या प्रयत्नातून महाराष्ट्रात एकमेव ऐतिहासिक निर्णय घेण्यास आग्रह धरला. तत्कालिक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून मोठी नियोजित कामे होण्यासाठी सर्व प्रक्रिया पूर्ण करून घेतली होती.

कोणताही ग्रामीण भाग हा शहराला जोडल्या नंतर त्या भागाचा विकास करण्यासाठी निधीची तजवीज करणे हे प्रशासनाला अनिवार्य असते. त्याच धर्तीवर कोपरगाव हद्दवाढ भागाचा विकास होण्यासाठी शासन निधी देण्यासाठी प्रक्रिया पुर्ण होणे सुरू आहे.

कुठलाही ग्रामीण भाग शहराला जोडल्या नंतर त्या भागासाठी रस्ते, वीज, पाणी, गटारी, सुशोभीकरण कामे यासाठी अनुशेष पूर्ण करण्यास निधी देण्याची आवश्यकता असते. कोपरगाव शहराला हद्दवाढ झालेला भाग पूर्वी अनेक सुविधा घेण्यासाठी आग्रही होता. मात्र, तांत्रिक अडचणी या भागासाठी नेहमी आडव्या येत होत्या. त्यावर मात करून कोल्हे यांनी ऐतिहासिक निर्णय घेऊन हद्दवाढ भागाचे भाग्य पालटले आहे.

आमच्या भागासाठी कोल्हे यांचा तो प्रयत्नशील निर्णय अविस्मरणीय आहे. आम्ही भारतात असून स्वतंत्र भारताच्या सोयी सुविधा यापासून वंचित राहतो की काय अशी वेळ आमच्यावर असताना कोल्हे यांनी पाठपुरावा करून नागरिकांच्या हाकेला साद देऊन आमचा समावेश कोपरगाव नगरपरिषद हद्दीत केला होता. पाणी आणि मूलभूत सुविधांच्या दृष्टीने अलीकडे पालिकेच्या ढिसाळ धोरणाचा आम्हालाही त्रास सहन करावा लागतो आहे. ही जरी वस्तुस्थिती आहे मात्र, किमान या भागाचा अनुशेष भरण्यासाठी शासनाला आमच्यावर लक्ष देणे आवश्यक झाले आहे.

आमचा मूलभूत अधिकार आणि नैसर्गिक न्यायाच्या भावनेने आम्हाला टप्प्याटप्प्याने निधी मिळून आमचा भाग सुख सुविधा युक्त विकास करेल अशी आमची खात्री आहे. या भागासाठी संजीवनी ठरलेला कोल्हे यांचा पाठपुरावा आणि निर्णय हा कोपरगाव हद्दवाढ भागासाठी नेहमी ऐतिहासिक आहे. याबद्दल शासनाकडून वेळोवेळी मंजूर होणाऱ्या निधीच्या आणि विकासाच्या शिल्पकार म्हणून आम्हाला कोल्हे यांचा अभिमान आहे. अशी प्रतिक्रिया गायकवाड यांनी दिली आहे.