१७ जागांच्या निवडणुकीसाठी ३६ उमेदवारी अर्ज दाखल

Mypage

शेवगाव प्रतिनिधी, दि.२८ : शेवगाव तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या संचालक मंडळाच्या २७ जानेवारीला होणार्‍या १७ जागांच्या निवडणुकीसाठी गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतीम मुदती अखेर एकूण ३६ जणांचे उमेदवारी अर्ज दाखल झाल्याची माहिती निवडणुक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक निबंधक विजयसिंह लकवाल यांनी दिली.

Mypage

उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्यात संस्थेचे विद्यमान उपाध्यक्ष बाळासाहेब विघ्ने, अरुण ढाकणे, शहादेव खोसे, लक्ष्मण गायके, तुळशीराम खताळ, प्रकाश हिंगे, एकनाथ मोरे, सुरेश मडके, मिलींद गायकवाड, विकास घोरतळे, मनेश बाहेती, अविनाश देशमुख, शारदा नेमाणे, सोनाली देशमुख, माणिक गायकवाड, अनिल इंगळे, अरुण जाधव, शिवाजी केसभट, आदिचा समावेश आहे. दरम्यान शुकवारी (२९डिसे) उमेदवारी अर्जाची छाननी होणार असून १५ जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची मुदत असून आवश्यकता भासल्यास २७ जानेवारीला सकाळी ८ ते दुपारी ४ पर्यंत मतदान होणार आहे.

tml> Mypage

मतदान संपल्यानंतर त्याच दिवशी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे. अवर्ग सहकारी संस्था प्रतिनिधी मतदार संघात ६६ मतदार असून उर्वरित मतदार संघात ९७८ व एक शासकीय अशा एकूण मतदाराची संख्या १०४५ आहे. प्रवर्ग निहाय सदस्य संख्या व दाखल उमेदवारी अर्जांची संख्या अशी-अ.वर्ग सहकारी संस्था प्रतिनिधींच्या १० जागांसाठी १४ उमेदवारी अर्ज, ब-वर्ग व्यक्ती शहा प्रतिनिधीच्या २ जागासाठी ७ अर्ज, महिला राखीव २ जागासाठी ३ अर्ज, अनुसुचीत जाती जमाती प्रतिनिधी एका जागेसाठी ४ अर्ज, इतर मागास वर्ग प्रतिनिधी एका जागेसाठी ६ अर्ज तर विमुक्त जाती भटक्या जमाती विमा प्रतिविधी एका जागेसाठी २ उमेदवारी अर्ज दाखल आहेत.

Mypage