माहेगाव देशमुख गावाचे माझ्यावर ऋण- आमदार काळे

कोपरगाव प्रतिनिधी, दि.११ : मतदार संघातील सुज्ञ मतदारांनी मला जनसेवेची संधी दिली यामध्ये कोपरगाव मतदार संघातील कोपरगाव शहरासह प्रत्येक गावांचे माझ्यावर ऋण असून त्याप्रमाणे माझी जन्मभूमी असलेल्या माहेगाव देशमुखचा देखील सहभाग आहे. विकास कामांच्या माध्यमातून या ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न करीत आहे असे प्रतिपादन आ. आशुतोष काळे यांनी केले.

आ. आशुतोष काळे यांची जन्मभूमी असलेल्या माहेगाव देशमुख ग्रामपंचायत कार्यालयाच्या नूतन इमारतीचे लोकार्पण त्यांच्या हस्ते पार पडले याप्रसंगी ते बोलत होते की, मतदार संघाचा लोकप्रतिनिधी या नात्याने मतदार संघातील प्रत्येक गावातील नागरिकांचे विकासाचे मुलभूत प्रश्न सोडविणे हे माझे कर्तव्य असून प्रत्येक गावाला विकासाच्या बाबतीत त्या गावात सत्ता असो वा नसो न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला असून त्याप्रमाणे माहेगाव देशमुखच्या देखील विकासाच्या समस्या सोडविल्या आहेत. 

माहेगाव देशमुख येथील श्री क्षेत्र अमृतेश्वर देवस्थानास ‘क’ वर्ग दर्जा मिळावा यासाठी शासन दरबारी प्रस्ताव दाखल करून केलेल्या पाठपुराव्यातून श्री क्षेत्र अमृतेश्वर देवस्थानास ‘क’ वर्ग दर्जा मिळवून दिला आहे. माहेगाव देशमुखसह, कोळपेवाडी, कोळगाव थडी सुरेगाव, शहाजापूर मळेगाव थडी, कुंभारी, धारणगाव, हिंगणी, मुर्शतपूर, सोनारी आदी गावातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न सोडविण्यासाठी प्राथमिक आरोग्य जवळपास पाच कोटीच्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे लोकार्पण झाले असून लवकरच नागरिकांच्या सेवेत रुजू होणार आहे.  

त्यामुळे रहदारी वाढली जावून त्याचा काही प्रमाणात छोट्या मोठ्या व्यवसायिकांना फायदा होणार आहे. याप्रमाणे प्रत्येक गावाच्या विकासाला निधी देण्यासाठी महायुती शासनाकडे पाठपुरावा सुरु असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी यावेळी सांगितले. यावेळी पंचायत समितीचे माजी उपसभापती अर्जुन काळे, सरपंच सुमन रोकडे, उपसरपंच भास्कर काळे, माहेगाव देशमुख सेवा सह. सोसायटीचे चेअरमन मधुकर काळे, व्हा. चेअरमन यशवंत देशमुख, संजय काळे, दीपक पानगव्हाणे, बाळासाहेब काळे, भास्कर लांडगे, रोहिणी जाधव, तृप्ती पानगव्हाणे, कल्पना पानगव्हाणे, शितल रोकडे, छाया काळे, 

मिना पवार, रविंद्र काळे, के.पी. रोकडे, भीमराव मोरे, भागिनाथ काळे, बापूसाहेब जाधव, प्रकाश काळे, जगन्नाथ जाधव, मच्छिंद्र जाधव, विकास रणशिंग, प्रल्हाद काळे, उल्हास काळे, वसंत काळे, बाबासाहेब पानगव्हाणे, भरत दाभाडे, अशोक काळे, शिवाजी काळे, अण्णासाहेब काळे, राधाकिसन काळे, दिलीप काळे, संतोष लांडगे, किरण काळे, शिवाजी पानगव्हाणे, शरद पानगव्हाणे, दिलीप पानगव्हाणे, सुरेश काळे, संभाजी पानगव्हाणे, सुखदेव काळे, भिकन सय्यद, शिवाजी दत्तात्रय काळे, रामदास हराळे, अविनाश काळे, नानासाहेब पानगव्हाणे, रमेश जाधव, बाजीराव पानगव्हाणे, शिवाजी लांडगे, रावसाहेब पानगव्हाणे, तुळशीराम पानगव्हाणे, नंदकिशोर कापसे, रावसाहेब काळे, पराग काळे, अण्णासाहेब पानगव्हाणे, 

नंदकिशोर चव्हाण, संजय कुलकर्णी, गुलाब देशमुख, अनिल काळे, ज्ञानेश्वर काळे, रामनाथ जाधव, भरत पानगव्हाणे, मारुती लांडगे, गणेश पानगव्हाणे, शैलेंद्र पानगव्हाणे, मयूर काळे, कुणाल पानगव्हाणे, अरुण काळे, मच्छिंद्र काळे, चंद्रकांत कापसे, अशोक पानगव्हाणे, अरुण पानगव्हाणे, बाबासाहेब पानगव्हाणे, उत्तम रोकडे, अनंत शिरसाठ, गणेश रोकडे, सुनील आहेर, मच्छिंद्र गावित्रे, संजय उगले, भिकन आमराळे, दत्तात्रय पानगव्हाणे, संजय पानगव्हाणे, गणपत रोकडे, पंचायत समिती अभियंता जगताप, ग्रामसेवक गोरक्षनाथ शेळके, ठेकेदार श्रीकांत काळे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.