विवेक कोल्हे यांच्या विकासाच्या पतंगाची आसमंताला गवसणी

कोपरगाव प्रतिनिधी, दि.१६ : कोपरगाव तालुक्यातील ब्राह्मणगाव येथील ग्रामपंचायतच्या वतीने १५ व्या वित्त आयोगातून करण्यात येणाऱ्या ३६.७४ लाख रुपयांच्या विविध विकास कामांचा शुभारंभ सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते विवेक कोल्हे यांच्या हस्ते मकर संक्रांतीच्या शुभमुहूर्तावर सोमवारी (१५ जानेवारी) करण्यात आला. सर्वसामान्य माणूस हा विकासाचा केंद्रबिंदू मानून कोल्हे कुटुंबीयांनी कोपरगाव मतदारसंघातील जनतेचे विकासाचे प्रश्न सोडविण्यास नेहमीच प्राधान्य दिले आहे. जनसेवेसाठी आम्ही सदैव तत्पर आहोत. ब्राह्मणगाव व परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी कोल्हे कुटुंबीय यापुढेही सर्वतोपरी सहकार्य करील, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जगन आहेर हे होते. यावेळी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे संचालक निवृत्ती बनकर, शांताराम बनकर, अशोक येवले, सेवानिवृत्त जिल्हा कृषी अधिकारी प्रकाश सांगळे, नाशिकचे पोलिस उपाधीक्षक संजय सांगळे, ब्राह्मणगावचे लोकनियुक्त सरपंच अनुराग येवले, उपसरपंच ज्ञानदेव जगधने, ब्राह्मणगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष चांगदेव आहेर, उपाध्यक्ष दादा पाटील आसने, साहेबराव येवले, शांताराम जगधने, सुदाम आहेर, दिलीप बनकर,

केशव येवले, बाळासाहेब बनकर, रामदास पवार, अण्णासाहेब वाकचौरे, फकिरा वाकचौरे, किशोर आहेर, लक्ष्मण जाधव, नामदेव बनकर, अण्णासाहेब जगधने, अर्जुन नरोडे, शंकर गायकवाड, रामदास आसने, कैलास आसने, तुकाराम आसने, विजय कालेकर, संदीप वाकचौरे, बाबुराव वाकचौरे, ग्रामपंचायत सदस्य संजय वाबळे, रावसाहेब शिंगाडे, देविदास आसने, कुसुमबाई बनकर, अनिता जाधव, वनिता बनकर, यमुनाबाई आसने, रंजना बनकर, सुनिता शिंगाडे, लहानुबाई माळी, रेणुका दोडके आदींची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे उदघाटक युवा नेते विवेक कोल्हे यांचे सरपंच अनुराग येवले, उपसरपंच ज्ञानदेव जगधने व ग्रा. पं. सदस्यांनी स्वागत केले. तसेच धामोरी येथील विलास माळी, कैलास माळी, राहुल वाणी, साळुंके अण्णा, अशोक भाकरे, पांडुरंग पगार, भैरवनाथ भाकरे, शिवाजी वाघ, दत्तात्रय पगार, सतीश भाकरे आदींनी विवेक कोल्हे यांचा सत्कार केला. विवेक कोल्हे म्हणाले, माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हेसाहेब यांचे ब्राह्मणगाव व परिसराशी अतूट नाते होते. ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास व्हावा, शेतकरी व सर्वसामान्य माणूस सुखी व समृद्ध व्हावा, हे त्यांचे स्वप्न होते व त्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले.

याप्रसंगी विवेक कोल्हे यांनी सर्व ग्रामस्थांना तसेच कोपरगाव मतदारसंघातील नागरिकांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या. तसेच लहान मुलांसोबत पतंग उडविण्याचा आनंदही त्यांनी लुटला. ब्राह्मणगावची गौरी पगारे हिने ‘झी मराठी’ वरील ‘सारेगम लिटिल चॅम्पस-२०२३’ या स्पर्धेत विजेतेपद पटकावून कोपरगाव तालुक्याचे नाव उंचावले आहे. या परिसरातील मुलींनीही एमपीएससीच्या स्पर्धा परीक्षेत नेत्रदीपक यश मिळवले आहे. ही आपल्या सर्वांसाठी निश्चितच अभिमानाची गोष्ट आहे. मुलांनी चांगले शिक्षण घेऊन मोठे व्हावे व यश मिळवून आपल्या परिसराचा नावलौकिक वाढवावा, असे विवेक कोल्हे म्हणाले.

स्व. कोल्हेसाहेबांनी ब्राह्मणगावसह कोपरगाव मतदारसंघात अनेक विकास कामे करून मतदारसंघाचा कायापालट घडवला. संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी पंचायत समिती, जिल्हा परिषदेसह मंत्रालय स्तरावर पाठपुरावा करून अनेक ग्रामपंचायतींना मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिल्यामुळे त्या निधीतून ग्रामीण भागात पाणी, वीज, रस्ते, गटारी, आरोग्य आदी मूलभूत सुविधा उपलब्ध झाल्या. त्यांच्या प्रयत्नातून इतर अनेक विकास कामे झाली.  

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने गेल्या नऊ वर्षांत विकासाचा मोठा टप्पा गाठला असून, सर्वसामान्यांच्या उन्नतीला प्राधान्य देऊन देशाच्या सर्वांगीण विकासासाठी ते समर्पित भावनेने अविरत काम करीत आहेत. ग्रामीण भागाच्या विकासावर त्यांचा भर असून, त्यांनी सुरू केलेल्या आयुष्यमान भारत, प्रधानमंत्री आवास योजना, पीएम गरीब कल्याण योजना, पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना, दीनदयाळ उपाध्याय अंत्योदय योजना यासारख्या अनेक योजनांमुळे सामान्य माणसांचे जीवनमान सुधारले आहे. त्यांनी गोरगरिबांना आनंदाचा शिधा वाटप करून मोठा दिलासा दिला. प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून प्रत्येकाला हक्काचे घर उपलब्ध करून देण्याचे काम ते करीत आहेत.

पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या सरकारने जनहिताच्या विविध विकास योजनांना गती दिली आहे. रोटी, कपडा, मकान या गरजा पूर्ण झाल्या असल्या तरी रस्ते, पाणी आणि वीज या मूलभूत सुविधा महत्त्वाच्या असतात. त्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. ग्रामीण भागाच्या विकासात स्थानिक स्वराज्य संस्थांचे खूप मोठे योगदान आहे. ग्रामपंचायतवर गावच्या विकासाची महत्त्वाची जबाबदारी असते.

ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी गावकऱ्यांच्या समस्या सोडविण्यास प्राधान्य देऊन सरकारच्या विविध योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करून गावाचा विकास करावा, असे आवाहन त्यांनी केले. प्रास्ताविकात सरपंच अनुराग येवले म्हणाले, ब्राह्मणगावच्या विकासामध्ये कोल्हे कुटुंबीयांचे मोठे योगदान असून, स्नेहलता कोल्हे व विवेक कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली यापुढील काळातही ब्राह्मणगावच्या विकासाची दमदार वाटचाल अखंड सुरू राहील. कार्यक्रमास ब्राह्मणगाव येथील ग्रामपंचायतचे पदाधिकारी, ब्राह्मणगाव व पंचक्रोशीतील विविध संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी, ग्रामस्थ व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.