ढाकणे पॉलिटेक्निक, ‘बेस्ट कॉलेज इन महाराष्ट्र’ पुरस्काराने सन्मानित

शेवगाव प्रतिनिधी, दि. ८ : तालुक्यातील राक्षी येथील के.सौ.सुनिताताई एकनाथराव ढाकणे पॉलिटेक्निक कॉलेज, या तंत्रनिकेतन महाविद्यालयास एशियन टुडे रिसर्च अॅण्ड मिडीया, नवी दिल्ली या जागतिक दर्जाच्या संस्थेमार्फत ग्रामीण भागात सामाजिक-आर्थिक विकासकामी प्रयत्नशील असलेल्या राष्ट्रीय स्तरावर पहिल्या ५० संस्थांसाठी दिल्या जाणाऱ्या  ‘बेस्ट पॉलिटेक्निक कॉलेज इन महाराष्ट्र’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ग्रामीण भागातील या संस्थेने आता पर्यत तब्बल तीन राष्ट्रीय पुरस्कार मिळविल्याबद्दल संस्थेचे प्रवर्तक एकनाथराव ढाकणे यांचे सर्व क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.

महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले,  विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत काल (दि ७ ) सायंकाळी चार वाजता हॉटेल ट्रायडेन्ट, मुंबई येथे ‘एज्युकेशन प्राईड समिट अॅण्ड अवार्ड २०२२’ अंतर्गत ह्या राष्ट्रीय स्तरावरील पुरस्काराचे वितरण शानदार सोहळ्यात करण्यात आले .  संस्थेचे अध्यक्ष  एकनाथराव ढाकणे व सचिव श्रीमती जयवंता रहाणे या उभयतांनी तो स्विकारला.

      या संस्थेला  यापूर्वी २०१२ साली देखील नवी दिल्ली येथे शिक्षा भारती पुरस्काराने तसेच २०१५ साली नॅशनल एक्सलन्स अवार्ड या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले होते. संस्थेच्या कार्याची दखल राष्ट्रीय स्तरातून घेतली जात असल्याने परिसरात आनंदाचे वातावरण आहे. करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर अतिशय प्रतिकुल परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या तासिका आणि प्रात्यक्षिक ऑनलाईन माध्यमातून घेण्यात आल्या. नियमित सॅनिटायझेशन, मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंगचे पालन, नियमित टेम्परेचर आणि ऑक्सीलेव्हल चेकींग करून करोनाला रोखण्याची काळजी घेतली. तसेच सर्व प्रशासकीय आणि अध्यापकीय कामकाज ऑनलाईन माध्यमातून करण्यात आले.

नियमित तासिकांबरोबरच विद्याथ्र्यांच्या शैक्षणिक अडीअडचणी सोडवण्यासाठी विभागप्रमुख, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी प्रयत्नशिल होते. नियमित तासिका प्रात्यक्षिकांबरोबरच संबंधित विषयाचे अद्ययावत ज्ञान देण्यासाठी गुगल मीट, युट्युव, पॉवर प्रेझेन्टेशन, स्कीलबेस्ड असाईनमेंट इत्यादी माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रचलित परीक्षा पद्धतीबरोबरच एमसीक्यू पद्धतीने अधिकाधिक सराव करून घेण्यात आले. याचाच परिपाक म्हणजे संस्थेचा उत्कृष्ठ निकाल आहे.

सन २०१० पासून मौजे राक्षी ता. शेवगाव याठिकाणी कार्यरत असलेल्या या तंत्रनिकेतन महाविद्यालयातून हजारो विद्यार्थी शिक्षण घेत असून पास आऊट झालेल्या बॅचपकी ५७ टक्के विद्यार्थी विविध कंपन्यांमध्ये काम करीत आहेत तर उर्वरित विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेत आहेत. येथे ग्रामीण भागातील गरजू व होतकरू विद्याथ्र्यांना शैक्षणिक शुल्कामध्ये विशेष सवलत दिली जाते. एकूणच ग्रामीण भागात रोजगारक्षम शिक्षण देणारी एकमेव संस्था म्हणून या संस्थेकडे पाहिले जाते. संस्थेमध्ये घेण्यात आलेल्या रोजगार मेळावे, कॅम्पस इंटरव्यूवच्या माध्यमातून आतापर्यंत किमान बाराशेहून अधिक विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी मिळाल्या आहेत.

राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानीत असलेल्या ढाकणे पॉलिटेक्निकमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग, सिव्हील इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग हे इंजिनिअरिंग डिप्लोमा अभ्यासक्रम शिकविले जातात. त्याचप्रमाणे प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्षासाठी ऑनलाईन शासकीय कोट्यातून प्रवेश घेण्यासाठी एफ.सी सेंटरची सुविधा उपलब्ध करून देण्यात येते. याठिकाणी विद्याथ्यांना विविध कोर्सबाबतची इत्यंभूत माहिती दिली जाते.

अनुभवी व तज्ञ शिक्षकवर्ग, उत्कृष्ट निकालाची परंपरा, सुसज्ज व अद्ययावत प्रयोगशाळा, नावाजलेल्या प्रकाशनांनी युक्त डिजीटल ग्रंथालय, अपंग विद्यार्थ्यांसाठी विशेष सोयी सुविधा, विद्यार्थी व विद्यार्थीनीसाठी स्वतंत्र वस्तीगृह व मेस सुविधा, अद्ययावत संगणक प्रयोगशाळा व २४ तास इंटरनेट सेवा, शासन निर्णयाप्रमाणे पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, भव्य क्रीडागण व स्पोर्टस सेंटर, विद्यार्थ्यांसाठी बस सेवा अखंडीत विजपुरवठा व सुरक्षा यंत्रणा, यांसारख्या अनेकविध सोयी-सुविधांनी संस्थेने अल्पावधीतच जनमानसात मानाचे स्थान पटकाविले आहे.

याची दखल घेत संस्थेस तब्बल तीन राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले आहे. याबरोबरच संस्थेमार्फत औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये इलेक्ट्रिशियन, वायरमन, वेल्डर, फिटर हे अभ्यासक्रम शिकवले जात आहेत. लवकरच संस्थेमार्फत मेडिकल कॉलेज, फार्मसी, एमबीए, बीसीएस, बीसीए हे अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत. संस्थेने अल्पावधीतच राष्ट्रीय स्तरावर ठसा उमटवल्याबावत अनेक शैक्षणिक, सामाजिक, राजकिय स्तरातून संस्थेचे अभिनंदन होत आहे.