शेवगाव न्यायालयाच्या प्रांगणात साखळी उपोषण सुरु

शेवगाव प्रतिनिधी, दि.०३ :  राहूरी येथील ॲड. राजाराम आढाव व पत्नि ॲड. मनिषा आढाव या दांपत्याच्या निघृण हत्येच्या निषेधार्थ तसेच ॲडव्होकेटस् प्रोटेक्शन ॲक्ट संमत करावा. या मागणीसाठी शेवगाव न्यायालयातील वकील संघाच्या पदाधिकारी व सदस्यांनी येथील न्यायालयाच्या प्रांगणात गेल्या एक तारखेपासून साखळी उपोषण सुरु केले आहे.

दरम्यान शनिवारी माजी आमदार चंद्रशेखर घुले व जनशक्ती मंचाचे अध्यक्ष ॲड. शिवाजी काकडे, ज्येष्ठ नेते अरुण लांडे, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस ॲड. प्रताप ढाकणे, वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष ॲड. प्यारेलाल शेख यांच्या सह अनेक मान्यवरांनी व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपोषण स्थळी भेट देऊन संघटनेच्या मागणीला पाठींबा देवून या कामी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याची हमी दिली.

जिल्हा वकिल संघाच्या निर्णयानुसार दि.०१ पासून शेवगावात साखळी उपोषण सुरु असून तेव्हा पासून सर्व वकिल न्यायालयिन कामकाजा पासून अलिप्त आहेत. या काळात वकिलाच्या गैरहजेरीमध्ये, प्रकरणांमध्ये पक्षकाराविरुद्ध कोणतेही आदेश पारित होऊ नयेत. या दुर्घटनेचे कामकाज फास्ट ट्रॅक न्यायालया द्वारे चालवावे. आदि मागण्याचे निवेदन संघटनेने दिले आहे.

या वेळी शेवगाव तालुका वकील संघाचे अध्यक्ष ॲड. रामदास बुधवंत, उपाध्यक्ष ॲड. व्ही. ए. भेरे, सचिव ॲड. संभाजी देशमुख, ॲड. अविनाश शिंदे,  माजी अध्यक्ष ॲड. कारभारी गलांडे, ॲड. लक्ष्मण लांडे, ॲड.नामदेव गरड, ज्येष्ठ विधिज्ञ ॲड अर्जुन जाधव, ॲड. द्वारकानाथ बटूळे, ॲड. रघुनाथ राठी, ॲड. संजय सानप, ॲड. विनायक आहेर, ॲड. शंकर भालसिग, ॲड. भागचंद उकिरडे, ॲड. महेश आमले, ॲड. मनोहर थोरात, ॲड. किरण अंधारे आदि वकिल उपस्थित होते.