संजीवनी इंजिनिअरींग काॅलेजच्या १३ नवोदित अभियंत्यांची विप्रो परी मध्ये नोकऱ्यांसाठी निवड

कोपरगाव प्रतिनिधी, दि.०७ : संजीवनी इंजिनिअरींग काॅलेजच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाच्या प्रयत्नाने विप्रो परी (प्रिसिजन ऑटोमेशन अँड रोबोटिक्स इंडिया प्रा. लि.) या जगभरातील मोठ्या ऑटोमेशन कंपन्यांपैकी एक असलेल्या कंपनीने कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह घेवुन मेकॅनिकल व मेकॅट्राॅनिक्स इंजिनिअरींग विभागातील १३ नवोदित अभियंत्यांची त्यांच्या अंतिम निकाला अगोरच नोकऱ्यांसाठी निवड केली आहे. यातील सर्वच अभियंत्ये ग्रामीण भागातील असुन अशा प्रकारे शेकडो ग्रामीण युवक युवती कुटूंबाचा आधार बनत आहेत, अशी माहिती संजीवनी इंजिनिअरींग काॅलेजने प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.

संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष नितिन कोल्हे यांनी विप्रो परीने निवड केलेल्या सर्व नवोदित अभियंत्यांचे व त्यांच्या भाग्यवान पालकांचे अभिनंदन करून त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी सर्व निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा  छोटेखानी कार्यक्रमात करून त्यांचे अभिनंदन केले. यावेळी मेकॅट्राॅनिक्स इंजिनिअरींग विभागाचे प्रमुख डाॅ. राजेंद्र कापगते, मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागाचे प्रमुख डाॅ. प्रसाद पटारे व ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाचे डीन डाॅ. विशाल तिडके उपस्थित होते.


मी कोपरगाव तालुक्यातील कासली या खेडेगावातील शेतकऱ्याची मुलगी. मी संजीवनीमध्ये प्रवेश घेतल्यापासुनच आम्हाला वेगवेगळ्या स्पर्धेत भाग घेण्याचे प्रोत्साहन व मार्गदर्शन मिळत असे. याच अनुषंगाने आमच्या १२ विद्यार्थ्यांच्या टीमला आयआयटी, दिल्ली येथे रोबोकाॅन स्पर्धेसाठी माझ्या डीपार्टमेंटच्या प्रयत्नाने सहभागी होण्याची संधी मिळाली. त्यातुन मला रोबोटीक्स, ऑटोमेशन, आदी बाबींची आवड निर्माण झाली. विप्रो परी ही ऑटोमेशनचीच कंपनी असल्यामुळे कंपनीच्या प्रतिनिधींनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली. संजीवनीमध्ये शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच इतरही बाबींचे ज्ञान मिळत असल्यामुळे माझी सहज नोकरीसाठी निवड झाली. मी शेतकरी कुटूंबातील आमच्या मागील अनेक पिढ्यांमध्ये एकही मुलगी नोकरी मिळण्याइतपत शिकू शकली नाही. परंतु, संजीवनीच्या प्रयत्नातुन मला नोकरी मिळाली, याचे सर्व श्रेय मी माझ्या काॅलेजला देते.-विध्यार्थीनी तृप्ती मलिक

विप्रो परीने निवड केलेल्या अभियंत्यांमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरींगच्या प्रतिक श्रीक्रिष्ण हांडे, यश दयाराम साळवे, सुमित सजन सानप, रितिका सुनिल वेलगुडे, तृप्ती गोरखनाथ मलिक, अदित्य संतोष जैन, अजितकुमार वसंत डौले व नयन सजन सानप यांची तर मेकॅट्राॅनिक्स इंजिनिअरींग विभागातील  आदित्य राजेंद्र बढे, साक्षी भाऊसाहेब गीते, प्राची अनिल जाधव, ऋषिकेश राजेश काळे व नकुल विजय निबे यांचा समावेश आहे.