जिनिंग अँड प्रेसिंग सोसायटीच्या उपाध्यक्षपदी नानासाहेब निकम यांची निवड

कोपरगावप्रतिनिधी, दि.०९ : कोपरगाव तालुका सहकारी कापूस जिनिंग अँड प्रेसिंग सोसायटीचे उपाध्यक्षपदी नानासाहेब भागवत निकम यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.

कोपरगाव तालुक्यातील शिंगणापूर येथील कोपरगाव तालुका सहकारी कापूस जिनिंग अँड प्रेसिंग सोसायटीचे विद्यमान उपाध्यक्ष सुभाष सोनवणे यांनी रोटेशननुसार आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर कोपरगाव तालुका सहकारी कापूस जिनिंग अँड प्रेसिंग सोसायटी शिंगणापूर या संस्थेच्या उपाध्यक्षपदी संस्थेचे मार्गदर्शक आ. आशुतोष काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत सर्वानुमते नानासाहेब भागवत निकम यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली.

नानासाहेब निकम यांच्या नावाची सूचना सचिन आव्हाड यांनी मांडली त्या सूचनेला महेश लोंढे यांनी अनु‌मोदन दिले. यावेळी आ. आशुतोष काळे यांनी नवनिर्वाचित उपाध्यक्ष नानासाहेब निकम यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी संस्थेचे चेअरमन गोरक्षनाथ जामदार, मावळते उपाध्यक्ष सुभाष सोनवणे, सचिन आव्हाड, संदीप शिंदे, गणेश गायकवाड, महेश लोंढे, संजय संवत्सरकर, नानासाहेब चौधरी, शंकर गुरसळ, पाराजी गवळी,  विमल गवारे, कांता दहे, शिवाजी शेळके, संतोष, वर्षे, जनरल मॅनेजर सुरेश काशिद आदी मान्यवर उपस्थित होते.

उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल नानासाहेब निकम यांनी माजी आमदार अशोक काळे व आ. आशुतोष काळे यांचे आभार मानले व संस्थेच्या प्रगतीसाठी सर्वांना सोबत घेवून काम करू अशी ग्वाही दिली.