मोदी सरकारच्या लोककल्याणकारी योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहचवा – स्नेहलता कोल्हे

कोपरगाव प्रतिनिधी, दि.१० : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात भाजपप्रणित ‘एनडीए’ चे सरकार सत्तेत आल्यापासून देशाचा वेगवान विकास झाला असून, देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी व सर्वांगीण विकासासाठी भाजप व नरेंद्र मोदी यांच्याशिवाय पर्याय नाही. आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने जनतेचा विश्वास पुन्हा एकदा संपादन करायचा आहे.

त्यासाठी भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांनी ‘गाव चलो अभियान’ प्रभावीपणे राबवून मोदी सरकारने गेल्या दहा वर्षांत राबविलेल्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवून पक्ष अधिक मजबूत करावा, असे आवाहन कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या प्रथम महिला आमदार व भाजप नेत्या स्नेहलता कोल्हे यांनी केले.

भाजपच्या वतीने सध्या संपूर्ण महाराष्ट्रात ‘गाव चलो अभियान’ राबवले जात असून, शनिवारी (१० फेब्रुवारी) स्नेहलता कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथे हे अभियान राबविण्यात आले. स्नेहलता कोल्हे यांनी श्री कचेश्वर व त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेऊन या अभियानाचा शुभारंभ केला.

या अभियानांतर्गत स्नेहलता कोल्हे व कार्यकर्त्यांनी माजी सैनिक गणेश रक्ताटे, राजेंद्र दैने, नंदूभाऊ पवार, प्रकाश कांबळे, नीलेश धीवर, हरिभाऊ लोहकणे, अमीर पठाण, अफजल सय्यद, गोकुळ शिंदे, सोमनाथ वाळुंज, अनिल लोहकणे, संभाजी सदाफळ, मुकुंद बिडवे आदींच्या निवासस्थानी तसेच जि.प.प्रा.शाळा, श्री पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर व स्थानिक व्यापाऱ्यांच्या दुकानांना भेटी दिल्या.

तसेच त्यांनी केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचे लाभार्थी, स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी, ज्येष्ठ कार्यकर्ते, शेतकरी, व्यापारी, शिक्षक, विद्यार्थी, महिला व महिला बचत गटाच्या महिलांना भेटून गेल्या दहा वर्षांत मोदी सरकारने जनसामान्यांसाठी राबविलेल्या विविध योजनांची माहिती त्यांना दिली.

याप्रसंगी स्नेहलता कोल्हे म्हणाल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रूपाने देशाला एक कार्यक्षम व धाडसी नेतृत्व लाभले असून, समाजातील शेवटचा माणूस सुखी व समृद्ध व्हावा. हा ध्यास उराशी बाळगून ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास और सबका प्रयास’ या मंत्रानुसार ते समर्पित वृत्तीने काम करत आहेत. पंतप्रधान मोदी यांनी गरीब, शेतकरी, नारीशक्ती, युवाशक्ती या चार स्तंभांवर विशेष लक्ष केंद्रित करून २०४७ पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनविण्याचा संकल्प सोडला आहे.

जनतेला पाणी, वीज, आरोग्य, दळणवळण आदी सर्व सुविधा पुरवून देशाचा सर्वांगीण विकास करण्याची गॅरंटी पंतप्रधान मोदींनी दिली आहे. मोदी सरकारची गेल्या दहा वर्षांतील प्रभावी कामगिरी, राबविलेल्या विविध जनकल्याणकारी योजना, मागच्या जाहीरनाम्यातील आश्वासनांची केलेली पूर्तता, विकसित भारताचा संकल्प सांगणाऱ्या यंदाच्या अंतरिम अर्थसंकल्पातील ठळक तरतुदी आदी माहिती तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘गाव चलो अभियान’ हाती घेण्यात आले आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने हे अभियान महत्त्वाचे असून, या अभियानात सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभागी होऊन प्रत्येक मतदारापर्यंत सरकारच्या विविध योजनांची माहिती पोहोचवून भाजपला समर्थन वाढविण्याचे काम करावे, असे आवाहन त्यांनी केले. देशाच्या व सर्वसामान्य जनतेच्या हिताला प्रथम प्राधान्य देऊन काम करणारा भारतीय जनता पक्ष हा एकमेव पक्ष आहे.

मागील दहा वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने पंतप्रधान आवास योजना, आयुष्मान भारत योजना, पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना, उज्ज्वला योजना, मोफत धान्य, जलजीवन मिशन, मुद्रा योजना अशा अनेक योजना यशस्वीपणे राबवून विकासाची क्रांती केली आहे. स्व. शंकरराव कोल्हे यांच्यापासून कोल्हे परिवाराचे कोकमठाण व परिसरातील लोकांशी ऋणानुबंध असून, स्व. कोल्हेसाहेब तसेच बिपीन कोल्हे, विवेक कोल्हे व आपण या भागातील विकासाचे अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत.

मोदी सरकारने जलजीवन मिशन, रेल्वेस्थानक, विमानतळ व अन्य विकासकामांसाठी दिलेला निधी आपणच मंजूर करून आणल्याचे सांगून फुकटचे श्रेय घेणाऱ्या तालुक्याच्या लोकप्रतिनिधींच्या खोट्या जाहिरातबाजीला व भूलथापांना जनतेने बळी पडू नये, असेही त्या म्हणाल्या. प्रास्ताविक भाजयुमोचे तालुकाध्यक्ष विक्रम पाचोरे यांनी केले.

यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष शरदनाना थोरात, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती साहेबराव रोहोम, माजी सभापती संभाजी रक्ताटे, भाजपचे तालुकाध्यक्ष कैलास रहाणे, शहराध्यक्ष डी. आर. काले, वसंत गायकवाड, पोपट पवार, रंगनाथ लोंढे, नंदकुमार पवार, अण्णासाहेब लोहकणे, जालिंदर निखाडे, दत्तात्रय रक्ताटे, दशरथ गायकवाड, दीपक चौधरी, प्रभाकर रहाणे, रंगनाथ गाडेकर, उत्तम चव्हाण, रामभाऊ रक्ताटे, सोपान रक्ताटे, दामोदर रक्ताटे, संदीप चाळक, शुक्राचार्य देवस्थान समितीचे अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड, पुजारी रमेश क्षीरसागर, सुभाष मोगरे, अॅड. महेश भिडे, विजय लोंढे, रघुनाथ रक्ताटे,

बाळासाहेब रक्ताटे, भागीनाथ लोंढे, नंदकिशोर रक्ताटे, सुखदेव वाघ, साहेबराव रक्ताटे, अशोक लोंढे, एकनाथ पवार, बबनराव दैने, विष्णुपंत टेके, शिवाजी कानडे, म्हाळू फटांगरे, तुकाराम टेके, राजेंद्र फटांगरे, अजय फटांगरे, सागर दैने, श्रावण फटांगरे, सतीश दैने, किरण दैने, अशोक टेके, विजय रक्ताटे, भागचंद रुईकर, सोमनाथ वाळुंज, अमीर पठाण, कैलास वाघ, कपिल महाजन, मोरेश्वर जोशी, अमीन सय्यद, अशोक कांबळे, संजय जाधव, मुकुंद बिडवे, केशव टेके, स्वाती गणेश रक्ताटे, मुक्ता भागवत रक्ताटे, शीला संदीप रक्ताटे आदींसह भाजपचे बुथप्रमुख, शक्ती केंद्रप्रमुख, पन्नाप्रमुख, अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ व महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.