मुख्यमंत्री शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त अनाथ मुलांच्या वसतिगृहात एलईडी टीव्ही भेट

शेवगाव प्रतिनिधी, दि.१० : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून येथील शेवगाव तालुका शिवसेनेच्या वतीने उचल फाउंडेशन संचलित अनाथ मुलांच्या वसतिगृहात ऑनलाईन शिक्षणासाठी मदत व्हावी; त्यांना जगाच्या चालू घडामोडी कळाव्यात म्हणून ४३ इंची एलईडी टीव्ही मान्यवरांच्या उपस्थितीत भेट देण्यात आला आहे.

या वेळी शिवसेना युवा सेना जिल्हा प्रमुख साईनाथ आधाट, तालुका प्रमुख आशुतोष डहाळे, विशाल परदेशी, संदीप लांडगे, शुभम कबाडी, ऋषिकेश बाहेती, प्रसाद डाके व उचल फाऊंडेशनच्या डॉ. मनीषा लड्डा, मिनाक्षी शिंदे, वसुधा सावरकर, सचिन खेडेकर आदी उपस्थित होते.

शिवसेना पदाधिकाऱ्यांनी उचल फाऊंडेशन चे कामकाज आस्थेने जाणून घेतले. केलेल्या सहकार्याबद्दल खेडेकर यांनी सर्वाचे आभार मानून धन्यवाद दिले.