गौतम सहकारी कुक्कुटपालन संस्थेच्या चेअरमनपदी कुलकर्णी व्हा. चेअरमनपदी शिंदे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १९ : कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव येथील गौतम सहकारी कुक्कुटपालन व्यावसायिक संस्थेच्या चेअरमनपदी विजयराव कुलकर्णी व व्हा. चेअरमनपदी प्रभाकर शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली असून कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आ.आशुतोष काळे यांनी त्यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

गौतम सहकारी कुक्कुटपालन व्यावसायिक संस्थेची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच ९ नोव्हेंबर रोजी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व उद्योग समुहाचे मार्गदर्शक माजी आमदार अशोकराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली व आ. आशुतोष काळे यांच्या नेतृत्वाखाली बिनविरोध पार पडली आहे.

या निवडणुकीत आ.आशुतोष काळे यांच्यासह भाऊसाहेब गोपाळराव भवर, प्रकाश माधवराव गवळी, चंद्रभान घमाजी घाटे, सुभाष रंभाजी कदम, विजयराव वसंतराव कुलकर्णी, प्रभाकर खंडेराव शिंदे, सुशील हरिभाऊ बोरावके, विक्रम म्हाळू बाचकर, माधव कचरू मेहेरखांब, सौ. सुमन देवचंद कडेकर, सौ.अलकाबाई रतनराव कदम हे सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत.

या संस्थेच्या चेअरमन, व्हा. चेअरमन पदाची निवडणूक नुकतीच निवडणूक अधिकारी एस.जी. मरकड यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी चेअरमनपदाच्या नावाची सूचना प्रकाश गवळी यांनी मांडली त्या सूचनेस प्रभाकर शिंदे यांनी अनुमोदन दिले. व्हा. चेअरमनपदाच्या नावाची सूचना विक्रम बाचकर यांनी मांडली त्या सूचनेस सुशील बोरावके यांनी अनुमोदन दिले.

यावेळी सर्व सदस्यांच्या अनुमतीने चेअरमनपदी विजयराव कुलकर्णी व व्हा. चेअरमनपदी प्रभाकर शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली असल्याचे निवडणूक अधिकारी निवडणूक अधिकारी एस.जी.मरकड यांनी जाहीर केले. निवडणुककामी कुक्कुटपालनचे मॅनेजर सुरेश पेटकर यांनी सहकार्य केले.

यावेळी आपल्या निवडीबद्दल चेअरमन विजयराव कुलकर्णी व व्हा.चेअरमन प्रभाकर शिंदे यांनी आ.आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कुक्कुटपालन संस्थेचे हित साधून सर्व संचालकांच्या मदतीने संस्थेला प्रगतीपथावर घेवून जाणार असल्याचे सांगितले. यावेळी सर्व संचालक उपस्थित होते.