ठाकरे जे बोलतो ते करुन दाखवतो याला मोदी साक्षीदार – उध्दव ठाकरे

 मोदींची गॅरंटी राहीली नाही, तर ठाकरेंची गॅरंटी

कोपरगाव प्रतिनिधी दि.१४ : राज्यात मी मुख्यमंत्री असताना केलेल्या अनेक विकास कामांचे उद्घाटन पंतप्रधान यांच्या हस्ते करुन श्रेय घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. कारण सध्या मोदींची गॅरंटी राहीली नाही, म्हणुनच मोदी गॅरंटी म्हणाऱ्यांना उध्दव ठाकरे यांनी गॅरंटीने केलेल्या कामांचे उद्घाटन करत उध्दव ठाकरे गॅरंटीचे आहेत. ठाकरे जे बोलुन दाखवतो ते करुन दाखवतो याचे साक्षीदार मोदी आहे. असा निशाणा ठाकरे यांनी मोदींवर साधला. कोपरगाव येथील जनसंवाद मेळाव्याच्या वेळी संवाद साधला. 

यावेळी उबाठा शिवसेनेचे खासदार संजय राऊत, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे, उमेश धुमाळ, माजी जिल्हाप्रमुख  राजेंद्र झावरे, संदिप वर्पे, प्रमोद लबडे, कैलास जाधव, शहर प्रमुख सनी वाघ, संजय सातभाई, सपना मोरे, भरत मोरे, डॉ. अजय गर्जे, शिवाजी ठाकरे, शरद खरात, आकाश नांगरे, यांच्यासह विविध पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे पुढे म्हणाले की, देशात हुकुमशाही विरुद्ध लोकशाही असा लढा होणार आहे. भारत सरकार ऐवजी मोदी सरकार म्हंटले जाते हे कुठुन आलं. सध्या मोदींची मिञ शाहीला संपवण्यासाठी जनता उभी आहे. जर यांना पुन्हा निवडून दिले तर हे देशाचे नाव बदलतील. देशभक्त समजून यांच्या विरोधात सर्वांनी आपसातील भेदभाव, जात पंथ विसरून देशाची लोकशाही कायम ठेवण्यासाठी तीचे रक्षण करण्यासाठी एकञ आले पाहिजे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जी घटना आपल्याला दिली ती घटनाच धोक्यात आहे. भाजपचं फडकं हे आमचा राष्ट्रध्वज होवू शकत नाही. ते फडकं धुनी भांडी करुन पुसण्यासाठी योग्य आहे. ते तुमच्याकडेच ठेवा. पण आमच्या तिरंग्याला हात लावण्याचा प्रयत्न केलात तर जाळून भस्म करु हे सांगण्यासाठी आज आपण एकञ आलोय. भारतरत्न पुरस्काराचा बाजार मोदींनी मांडला आहे. ज्या पुरस्कार दिला ते तितकेच तोलामोलाची माणसं आहेत. परंतू गेल्या १० वर्षात ते मोदींना का कळाले नाहीत.

स्व. स्वामीनाथन यांना राष्ट्रपती करा म्हणत होतो, तेव्हा केले नाही. ते जिवंत असताना भारतरत्न दिला नाही. केवळ निवडणुकीच्या तोंडावर भारतरत्न देताय. खरे भारतरत्न हे गोरगरीब जनता आहे. ते आहेत म्हणून तुम्ही आहात. पण तेच आमच्या बरोबर आहेत असे म्हणत ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी व त्यांच्या समर्थकांचा समाचार आपल्या ठाकरे शैलीत घेतला.