कोपरगाव प्रतिनिधी, दि.२१ : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९४ व्या जयंतीनिमित्त युवा नेते विवेक कोल्हे यांच्या संकल्पनेतून संजीवनी युवा प्रतिष्ठानने कोपरगाव शहरातील छत्रपती शिवाजी स्मारकासमोर मंगळवारी (२० फेब्रुवारी) रात्री टीव्ही स्टार सुप्रसिद्ध युवा शाहीर रामानंद उगले यांचा ‘शाहिरी शिवदर्शन’ व लोकगीतांचा कार्यक्रम हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीत पार पडला. या नेत्रदीपक कार्यक्रमात संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या युवा सेवकांनी बळीराजाच्या शेतात पिकलेल्या विविध डाळी आणि धान्यापासून साकारलेली छत्रपती शिवाजी महाराज यांची सुंदर प्रतिकृतीने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले होते.
याप्रसंगी युवा शाहीर रामानंद उगले व माधवी उगले यांनी आपल्या सुश्राव्य वाणीतून पोवाडे व लोकगीतांचे लाजवाब सादरीकरण करून शिवकालीन इतिहास, राजमाता जिजाऊ मॉंसाहेब व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यकर्तृत्वाला उजाळा दिला. रसिक कोपरगावकरांनी उत्स्फूर्तपणे शिवछत्रपतींचा जयघोष व टाळ्यांचा कडकडाट करत त्यांना दाद दिली. कोपरगाव मतदारसंघाच्या प्रथम महिला आमदार स्नेहलता कोल्हे, संजीवनी युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष युवा नेते विवेक कोल्हे, संजीवनी महिला बचत गट बहुउद्देशीय सेवाभावी सहकारी संस्थेच्या अध्यक्षा रेणुका कोल्हे यांनी उगले व त्यांच्या सहकारी कलाकारांचा तसेच शिवव्याख्यात्या भक्ती देवडे व छत्रपती शिवाजी स्मारकाची देखभाल करणारे भाऊराव राखपसारे यांचा सत्कार करून त्यांचे कौतुक केले.
विवेक कोल्हे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली सर्व युवा सेवकांनी या कार्यक्रमाचे अतिशय सुंदर व नेटके नियोजन केल्याबद्दल रामानंद उगले यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले. शिवजयंतीच्या या अनोख्या सोहळ्यातून शिवविचारांचा जागर तर झालाच; शिवाय आमच्यासारख्या लोककलावंतांना प्रोत्साहन मिळाले, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. या सोहळ्यास शिवप्रेमी नागरिक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. त्यात महिलांची व तरुण-तरुणींची लक्षणीय उपस्थिती होती. हा कार्यक्रम संपेपर्यंत सर्व नागरिक कार्यक्रमस्थळी बसून होते हे विशेष.
कोपरगावच्या इतिहासात यापूर्वी कधीही झाला नव्हता असा दिमाखदार सोहळा यंदा शिवजयंतीनिमित्त प्रथमच पार पडला. कसलाही धांगडधिंगा व थिल्लरपणा नसलेला हा सोहळा अत्यंत शांततेत व तितक्याच उत्साहपूर्ण वातावरणात साजरा झाला. त्यामुळे महिलांसह आबालवृद्धांनी मनमुरादपणे या सोहळ्याचा आनंद लुटला. संजीवनी युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी हा सुंदर कार्यक्रम घेऊन शिवप्रेमी नागरिकांना शिवजयंतीची अविस्मरणीय भेट दिली असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केल्या.
यावेळी ज्येष्ठ नेते शरदनाना थोरात, ‘अमृत संजीवनी’ चे अध्यक्ष पराग संधान, बाजार समितीचे सभापती साहेबराव रोहोम, भाजपचे शहराध्यक्ष दत्ता काले, कोल्हे साखर कारखान्याचे उपाध्यक्ष मनेष गाडे, संचालक बाळासाहेब वक्ते, बाळासाहेब पानगव्हाणे, रमेश घोडेराव, बापूसाहेब बारहाते, माजी नगराध्यक्ष दिलीप दारुणकर, राजेंद्र सोनवणे, रवींद्र पाठक, बाळासाहेब नरोडे, विजय आढाव, विनोद राक्षे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख कैलास जाधव, शहरप्रमुख सनी वाघ, माजी उपनगराध्यक्ष विजय वाजे, योगेश बागुल, स्वप्नील निखाडे, माजी नगरसेवक अशोक लकारे, जनार्दन कदम, संदीप देवकर,
जितेंद्र रणशूर, दिनेश कांबळे, सत्येन मुंदडा, प्रदीप नवले, मनोहर शिंदे, महावीर दगडे, कैलास खैरे, वैभव आढाव, सुशांत खैरे, नरेंद्र डंबीर, गोपीनाथ गायकवाड, रामदास शिंदे, दीपक जपे, विजय चव्हाणके, सचिन सावंत, प्रसाद आढाव, सतीश रानोडे, जगदीश मोरे, दादासाहेब नाईकवाडे, प्रमोद नरोडे, पिंकी चोपडा, खलिक कुरेशी, फकिर मोहम्मद पैलवान, इलियास खाटिक, शंकर बिऱ्हाडे, चंद्रकांत वाघमारे, शाहरुख शेख, सागर जाधव,
मोनिका संधान, भाजप महिला मोर्चाच्या शहराध्यक्षा वैशाली आढाव, माजी नगराध्यक्षा तारा जपे, माजी नगरसेविका विद्या सोनवणे, शिल्पा रोहमारे, विजया देवकर, मंगल आढाव, दीपा गिरमे, सुवर्णा सोनवणे, हर्षादा कांबळे, आशा सोनवणे, आढाव आदींसह शिवप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या शिवजयंती उत्सव कमिटी-२०२४ आणि सर्व युवा सेवकांनी परिश्रम घेतले.