मतदार संघातील प्रत्येक गावात निधी देण्याचा प्रयत्न – आमदार राजळे

शेवगाव प्रतिनिधी, दि.२४ विधानसभा मतदार संघातील दोन्ही तालुक्यातील विविध विकास कामांचा अनुशेष भरून काढण्यासाठी आमदार निधीसह राज्य शासनाच्या वेगवेगळ्या योजना मधून कोट्यावधी रुपयाचा निधी मतदार संघातील प्रत्येक गावात देण्याचा प्रयत्न केला असल्याने विविध विकासाची कामे मार्गी लागली असल्याचे प्रतिपादन आमदार मोनिका राजळे यांनी केले आहे

तालुक्यातील मुंगी व कांबी येथे मिळून ११ कोटी ७५ लाख रुपयांच्या कामांचे भूमिपूजन आ.राजळे यांचे हस्ते झाले. यावेळी त्या बोलत होत्या कि, मी दुसऱ्यांदा तुमच्या आशिर्वादाने विधानसभेत गेले. त्यावेळी सुरुवातीचे अडीच वर्ष विरोधात बसावे लागल्याने विकास कामासाठी निधीच उपलब्ध न झाल्याने काहीच करता आले नाही.

मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री पदी देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांचे सरकार येताच आमदार निधीसह शासनाच्या विविध विभागामार्फत मतदार संघातील विकास कामे करण्यासाठी भरीव निधी मिळू लागल्याने मतदार संघातील अनेक कामे मार्गी लावण्यासाठी मी व माझे सहकारी सातत्याने प्रयत्न करत आहोत.

असे सांगून आ.राजळे म्हणाल्या की, आता लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन विरोधक हळदी-कुंका सह इतरही कार्यक्रम हाती घेऊन तुम्हाला फसवण्यासाठी पुढे येतील व दिशाभूल करून आपली पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करतील. तरी आपण विकासाची कामे करणाऱ्यांच्या मागे भक्कम ताकदीनीशी उभे रहावे.असे आ.राजळे शेवटी म्हणाल्या. 

यावेळी भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष ताराचंद लोढे, बापूसाहेब पाटेकर, भीमराज सागडे, डॉ. निलेश मंत्री, प्रा.भाऊसाहेब मुरकुटे,सुरेश नेमाने, संदीप देशमुख,अनिल परदेशी, मोहन डमाळे, नारायण पाखरे, सुनिल वडघणे, दिगाबर टोके, मुरलीधर लोखंडे, बाबासाहेब धस, कालिदास ढाकणे, सोमनाथ मडके, पांडुरंग तहकीक, बाबा सावळकर,अशोक बाणाईत, बाळासाहेब लवंगे, भागवत तेलोरे, दत्तात्रय उन्मेेघ, सुरेश दिवटे, श्याम बुटे, भगवान मामा तेलोरे, प्रल्हाद तहकीक या प्रमुखासह जलसंधारण विभागाचे उपविभागीय अधिकारी प्रवीण दहातोंडे,

सा.बा.चे शाखा अभियंता शैलेश साबळे, गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर बाळासाहेब मुरदारे, भगवान खुरमुरे मुंगी येथे कुद्दूसभाई पठाण, लक्ष्मण देवढे, पांडुरंग मिसाळ, श्रीरंग गोर्डे, उमाजी राजभोसले, मधुकर ठुबे, सोमनाथ मडके, मारुती गोर्डे तर कांबी येथे उपसरपंच सुनिल राजपूत, अविनाश म्हस्के, बाळासाहेब खरात, दत्ता पा.थोरात, बाळासाहेब म्हस्के, उषा होळकर, रा.स.प.चे बाजीराव लेंडाळ, राजेंद्र खोषे, राधाकिसन बुडखे, रमेश खोसे, राजेंद्र खोसे, विजय लेंडाळ यांचेसह ग्रामस्थ मोठ्या संख्यने उपस्थितीत होते.