जागतिक महिला दिनानिमित्त तीन दिवसीय विशेष समारोहाचे आयोजन

शेवगाव प्रतिनिधी, दि.०५ : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आमदार मोनिका राजळे यांच्या संकल्पनेतून शेवगावात आठ ते दहा मार्च अशा  तीन दिवसीय विशेष समारोहाचे आयोजन करण्यात आले आहे.

येथील आखेगाव रस्त्यावरील लक्ष्मी नारायण मंगल कार्यालयात महिलांसाठी नारीशक्ती महिला बचत गट, हिरकणी महिला बचत गट आणि सावित्री महिला बचत गट यांच्या संयुक्त विद्यमाने सलग तीन दिवस विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून महिला मुलींसाठी मोठ्या प्रमाणात आकर्षक किंमती बक्षीसांचे आयोजन करण्यात आले आहे.

या वेळी बेस्ट वुमन शेवगाव, मिस शेवगाव, विविध गटातील डान्स स्पर्धा, खानपान स्पर्धा, शॉपिंग फेस्टिवल अशा स्वरूपाचे भरगच्च कार्यक्रम आहेत. तीन दिवस सकाळी दहा ते रात्री दहा वाजेपर्यंत हे कार्यक्रम होणार असून ‘मीस शेवगाव’ स्पर्धेत निवड होणाऱ्या महिलांना प्रथम पारितोषिक ११ हजार, द्वितीय ५ हजार, तृतीय ३ हजार रु, १८ ते २७ वयोगटातील मुलींसाठी तसेच व खुला गट महिलानृत्य स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक ५ हजार, द्वितीय ३ हजार तर तृतीय पारितोषिक २ हजार रु याशिवाय उत्तेजनार्थ आणि सहभाग घेतल्याबद्दल अनेक पारितोषिके ठेवण्यात आली आहेत.

स्पर्धेत भाग घेणाऱ्या प्रत्येक महिलेसाठी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. प्रवेशासाठी टायपर्स कॉम्प्युटर अँड टाईपराईटर इन्स्टिट्यूट खंडोबा नगर,  पंचायत समिती रस्ता शेवगाव येथे संपर्क साधावा असे आवाहन संयोजकांमार्फत करण्यात आले आहे .

शेवगाव शहरांत महिला-मुलीसाठी अशा स्वरूपाचे भव्य आयोजन प्रथमच होत असल्याने विविध स्पर्धां बरोबरच खानपान व शॉपिंग फेस्टीवल मध्ये खरेदीचा मन मुराद आनंद महिलांना घेता यावा यासाठी सामाजिक कार्यकर्त्या सिमा संजय बोरुडे प्रयत्नशील आहेत.