कोपरगाव प्रतिनिधी, दि.०७ :- कोपरगाव नगरपरिषद हद्दीतील विविध विकास कामांसाठी साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजना २०२३-२४ अंतर्गत विविध विकास कामांना १.६५ कोटी निधीच्या कामांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती आ. आशुतोष काळे यांनी दिली आहे.
कोपरगाव शहराच्या विकासासाठी आ.आशुतोष काळे यांनी आजपर्यंत कोट्यावधी रुपयांचा निधी मिळविला असून या निधीतून झालेल्या विकास कामांमुळे कोपरगाव शहराचा चेहरा-मोहरा बदलला आहे. तरीही कोपरगाव शहराच्या विकासासाठी अधिकचा निधी मिळावा यासाठी पालकमंत्र्याकडे त्यांचा पाठपुरावा सुरु होता. त्या पाठपुराव्यातून कोपरगाव शहरासाठी १ कोटी ६५ लक्ष ५८ हजार निधी मंजूर करण्यात आला आहे.
या निधीतून कोपरगाव नगरपरिषद हदीतील प्रभाग क्र. ०१ मधील अनिरुध्द उबाळे घर ते दत्तात्रय निकुंभ घर, चैतन्य प्लाझा ते अजय गुप्ता घर, कृष्णा आवारे घर ते हजारे घर, मातोश्री बंगला ते मीराताई साळवे घर ते गुंजाळ घर ते होन घर, पाण्याची टाकी ते रामभाऊ देवकर प्लॉटपर्यत भुयारी गटार बांधकाम करणे. प्रभाग क्र.०१ मध्ये झोळगे घर ते निकुंभ घर ते साहेबराव कोपरे घर रस्ता, विलास सैंदनशिव घर ते डिपी रस्ता कॉक्रीटीकरण करणे.
नगरपरिषद हद्दीतील प्रभाग क्र. ०७ मध्ये बाळु सोनटक्के घर ते इक्बाल घरापर्यत रस्ता कॉक्रीटीकरण करणे. नगरपरिषद हद्दीतील प्रभाग क्र.०८ मध्ये विक्रम वाळुंज घर ते भैय्या भालेराव घर ते नाल्यापर्यत भुयारी गटार बांधकाम करणे. प्रभाग क्र.०८ मध्ये कटारनवरे घर ते गोरक्षनाथ गायकवाड घर, जितु रणशुर घर ते लासणकर घरापर्यत रस्ता कॉक्रीटीकरण करणे. प्रभाग क्र. १० मध्ये केवल लोंगाणी घर ते टॉवरपर्यत, सचिन पाडोळे घर ते राजू भारस्कर घर व विशाल व-हे घर ते दारुवाला घरापर्यत रस्ता कॉक्रीटीकरण करणे या कोपरगाव नगरपरिषद हद्दीतील कामांचा समावेश आहे.
कोपरगाव शहराच्या विकासकामांना निधी मंजूर केल्याबद्दल आ. आशुतोष काळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना. अजित पवार, महसूल मंत्री तथा पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे यांचे आभार मानले आहे.