संपत भारुड व कौशल्या भारुड यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार प्रदान

कोपरगाव प्रतिनिधी, दि.१२ : तालुक्यातील संवत्सर येथील रहिवासी व माजी जिल्हा परिषद सदस्य संपत जमनराव भारुड व कौशल्या संपत भारुड यांना नुकताच सामाजिक न्याय विभागाचा सन 2019 चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते सामाजिक न्याय विभागाचे प्रमुख मान्यवर यांचे हस्ते नुकताच मुंबई येथे प्रदान करण्यात आला.

भारुड यांनी जवळ पास बारा तेरा वर्षे जि. प. सदस्य असताना अनेक योजना गोरगरिबा पर्यंत पोहचून त्यांना सक्षम बनविण्यासाठी परिश्रम घेतले.  सामाजिक न्यायहक्कासठी लढे देऊन अनेकांना न्यायमिळवून दिलेला असून ते लाँग मार्चचे नेते प्रा.जोगेंद्र कवाडे यांचे निकटवर्तीय असून ते त्यांच्यासारखेच दिसतात.

भारूड यांनी अनेक वंचितांच्या विकासाचे कार्य केले असुन कोपरगाव येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर वरती बोट असणाऱ्या पुतळ्यासाठी प्रा.कवाडे, व शिवाजी ढवळे, व सकल आंबेडकरी समाज बरोबर घेवून अनेक समाज हितासाठी आंदोलने केली असुन मागासवर्गीय जयभीम स.पाणी वाटप सोसायटी कै.माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांच्या पुढाकाराने निर्माण करून मागासवर्गीय शेतकरयांना पाट पाण्यासाठी नेहमी संघर्ष करत असतात. सर्वच समाजासाठी त्यांचें मोठे योगदान असून पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.