माजीमंत्री कोल्हेंचा लढवय्या बाणा सदैव सर्वांच्या स्मरणांत – विवेक कोल्हे

कोपरगांव प्रतिनिधी, दि. १६ : संजीवनी उद्योग समुहाचे संस्थापक, माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांची सामाजिक, राजकीय, सहकार, कृषि, शिक्षण, सिंचन, सांस्कृतिक आदि क्षेत्रातील झुंजार कारकिर्द सर्वांनाच प्रेरणादायी असून त्यांचा लढवय्या बाणा सदैव सर्वांच्या स्मरणांत राहणारा असल्याचे प्रतिपादन सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी केले.

शहरातील अष्टविनायक मित्र मंडळ व त्यांच्या सहका-यांनी प्रथम पुण्यस्मरणानिमीत्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतीगृहातील मुलांना महिनाभर मिष्टान्न देवुन शासकीय, निमशासकीय, गरीब, दीन दलित, उपेक्षीत, अल्पसंख्यांकांसह सर्व क्षेत्रातील सहयोगी प्रतिष्ठीतांसह सदस्यांना स्व. शंकरराव कोल्हें यांच्या आठवणींना उजाळा देण्याची संधी निर्माण करून दिली, खरोखरच हा उपक्रम प्रेरणादायी आहे असेही ते म्हणाले.

              प्रारंभी माजी नगरसेवक बबलू वाणी, संदीप देवकर, विनोद राक्षे यांनी प्रास्ताविक केले. याप्रसंगी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष शरद थोरात, माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे, राजेंद्र शिंदे, दिलीप दारुणकर, राजेंद्र सोनवणे, कोल्हे कारखान्याचे माजी संचालक बाळासाहेब नरोडे, अमृत संजीवनी शुगरकेन ट्रान्सपोर्ट कंपनीचे अध्यक्ष पराग संधान, माधवराव आढाव पतसंस्थेचे अध्यक्ष विजय आढाव, पालिका भाजप माजी गटनेते रवींद्र पाठक, भाजप तालुकाध्यक्ष साहेबराव रोहम, शहराध्यक्ष दत्तात्रय काले, कैलास खैरे, संजीवनी पतसंस्थेचे अध्यक्ष प्रदीप नवले, साई संजीवनी बँकेचे संचालक नारायण अग्रवाल, शिवसेना नेते कैलास जाधव, माजी उपनगराध्यक्ष विजय वाजे, योगेश बागुल, स्वप्निल निखाडे, माजी नगरसेवक अतुल काले,  अशोकराव लकारे, संजय जगदाळे, बापू पवार, शिवाजीराव खांडेकर, नसीरभाई सय्यद, सद्दामभाई सय्यद, गोपीनाथ गायकवाड, राजेंद्र बागुल, महेश खडामकर, दादासाहेब नाईकवाडे, रवींद्र रोहमारे, अविनाश पाठक, वैभव आढाव, प्रसाद आढाव, मुकुंद उदावंत,

रोहित कनगरे, सुनील पांडे, विक्रांत सोनवणे, सिद्धांत सोनवणे, मुक्तारभाई शेख, खलिकभाई कुरेशी, जयप्रकाश आव्हाड, रवींद्र लचुरे, सचिन सावंत, सलीम पठाण, फकीर मोहम्मद पहिलवान, अनिल नरोडे, विजय चव्हानके, सतीश चव्हाण, गोपीनाथ सोनवणे, इलियास शेख, संतोष नेरे, सागर जाधव, साई नरोडे, शंकर बिऱ्हाडे, सतीश रानोडे, प्रसाद नरोडे, संतोष साबळे, चैतन्य जगदाळे, नंदू वायडे, शफिक सय्यद, नारायण गवळी, रोहित खडामकर, राजेंद्र भंडारी, संजय खरोटे, गोरख देवडे, आसिफ शेख आदींसह भाजप, भाजप युवा मोर्चा, शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते विविध संस्थांच्या आजी-माजी संचालक, अध्यक्ष,उपाध्यक्ष, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.