चंद्रकांत अच्युतराव मनवेलीकर यांचे निधन

शेवगाव प्रतिनिधी, दि.१५ :  शेवगाव येथील चंद्रकांत अच्युतराव मनवेलीकर (वय७५) यांचे शुक्रवारी  (दि.१५) सकाळी ११ ला वार्धक्याने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर शेवगाव अमरधाममध्ये सायंकाळी साडे सहाला अंत्यसंस्कार करण्यात आले.

त्यांच्या पश्च्यात पत्नी निर्मला ताई, मुलगी योगिता भालेराव, व कु. रेणुका, रुद्रांश व देवांश ही तीन नातवंडे असा परिवार आहे.

श्री रेणुका मल्टिस्टेट अर्बन क्रेडिट सोसायटी संस्थेचे दिवंगत ज्येष्ठ संचालक कै. योगेश भालेराव यांचे ते सासरे होत.