शेवगाव तहसील कार्यालयात डिसेंबर २४ अखेर १३१ रस्त्याचे दावे दाखल

शेवगाव प्रतिनिधी, दि. १२ : तालुक्यातील अनेक गावातील शेतकऱ्यांनी आपल्या मालकी हक्काच्या शेतात जाण्यासाठी सनदशीर मार्गाने रस्ता मिळावा यासाठी डिसेंबर २०२४ आखेर तालुक्यातील १३१ शेतकऱ्यांनी शेवगाव तहसीलदार प्रशांत सांगडे यांच्याकडे वकिला मार्फत  ५/२ चे ९४ तर  १४३ चे ३७ असे  एकूण १३१ दावे दाखल करण्यात आले असून . सध्या ते द्रुत गतीने मार्गी लावण्याचे काम चालू आहे.

या बाबतची अधिक माहिती अशी आहे की, राज्य शासनाच्या महसूल विभागाशी निगडित असलेल्या तहसीलदार यांना प्रथम न्यायालय म्हणून या विषयाचा न्याय निवडा करण्याचे अधिकार शासनाने दिलेले असून त्यानुसार ही प्रक्रिया पार पडत आहे.

या रस्त्यांच्या दाव्यासाठी वादी – प्रतिवादी यांना वकिलामार्फत तहसीलदार यांचे समोर आपले म्हणणे मांडणेसाठी उभे रहावे लागत असून तहसीलदार संबंधितांच्या प्रत्यक्ष बांधावर जाऊन सत्य पडताळणी करून निकाल देतात. दिलेला निकाल वादी – प्रतिवादीस  मान्य नसला तर त्यावर अपिल करता येते.

या कामी तहसीलदार यांनी स्वतः सह निवासी नायब तहसीलदार, नायब तहसीलदार महसूल,नायब तहसीलदार संजय गांधी योजना व नायब तहसीलदार निवडणूक यांना मंडल निहाय पडताळणीसाठी नेमले असून तालुक्याच्या ८ महसूल मंडलाद्वारे ही प्रक्रिया चालू असल्याची माहिती तहसील कार्यालयातून समजलीआहे.