जीवन सार्थकी लावण्यासाठी महावीरांची शिकवण आत्मसात करावी – आमदार राजळे

शेवगाव प्रतिनिधी, दि.२२ :  भावान महाविरांचे व्यावहारिक जीवन, औदार्य आणि समभावाची प्रचिती देणारे असून जगाला अंहिसेची शिकवण देणारी  त्यांची शिकवण ही सामाजिक कल्याणसाठी आहे. आपण प्रत्येकाने ती आत्मसात केली पाहिजे. भगवान महावीर हे त्याग करुणा आणि संवेदनशीलतेचे मूर्तिमत प्रतीक आहे. त्यांनी सदाचार संयम करुणा आणि अहिंसेची शिकवण समाजाच्या कल्याणासाठी दिली. आपले जीवन सार्थकी लावण्यासाठी त्यांची शिकवण आत्मसात करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन आमदार मोनिका राजाळे यांनी केले.

शेवगावच्या सकल जैन समाज तसेच नवकार युवक मंडळ तसेच एकता बहू व महिला मंडळाच्या संयुक्त विदयमाने येथील जैन स्थानकात मोठ्या उत्साहात आयोजित भगवान महावीर जयंती सोहळ्यात त्या बोलत होत्या.

रविवारी जैन स्थानकापासून समाज बांधवांनी भगवान महावीरांच्या प्रतिमेची स्थातून सवादय भव्य मिरवणूक काढली. पिवळे लफ्फेदार फेटे परिधान केलेले  अनेक युवक तसेच गुलाबी साड्या परिधान केलेल्या महिला, मुली मिरवणुकीत सहभागी झाल्या होत्या. मिरवणूक मोची गल्ली मार्गे आंबेडकर चौक क्रांती चौक आणि बाजारपेठेतून परत जैन स्थानकात आली.

तेथे आमदार राजळे यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम पार पडले. मिरवणुकीत जैन समाज बांधवांनी सजीव देखाव्याद्वारे उद्बोधन करतांना सामाजिक एकोपा, बेटी बचाव बेटी पढाव, अहिंसा, पर्यावरण संवर्धन, पाणी वाचवा तसेच संपूर्ण शाकाहार याबाबत जनजागृती केली.