१८ वर्षापासून गौतमचा निकाल १००%

  कोपरगाव प्रतिनिधी, दि. २८ : मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या एस.एस.सी. परीक्षेमध्ये कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटी, संचालित गौतम पब्लिक स्कूलने आपली १८ वर्षाची १००% निकालाची ऐतिहासिक परंपरा अबाधित ठेवली असल्याची माहिती प्राचार्य नूर शेख यांनी दिली आहे.

महाराष्ट्र स्टेट बोर्डाने घेतलेल्या मार्च २०२४ च्या एस. एस. सी. परीक्षेसाठी गौतम पब्लिक स्कूलचे एकूण १०१ विद्यार्थी प्रविष्ट झालेले होते. यामध्ये विशेष प्राविण्य श्रेणीमध्ये ७० विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून प्रथम श्रेणीमध्ये २८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर  द्वितीय श्रेणीमध्ये ०३ विद्यार्थी उत्तीर्ण होवून सर्वच विद्यार्थ्यांनी उज्वल यश संपादन केले आहे.

कुमार वेदांत ज्ञानदेव निर्मळ या विद्यार्थ्यांने ९१% गुण मिळवून शाळेत प्रथम येण्याचा मान मिळविला तर कु. समृद्धी कौतिक रसाळ या विद्यार्थिनीने ८९.८०% गुण मिळवून द्वितीय क्रमांक पटकावला आहे. आदित्य प्रकाश देशमुख व कु.आदिती विकास तासकर या विद्यार्थ्यानी समसमान ८९.६०% गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला आहे.

कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन मा.आ.अशोकराव काळे, विश्वस्त आ. आशुतोष काळे, सचिव सौ. चैतालीताई काळे, व्हा.चेअरमन छबुराव आव्हाड, सर्व गव्हर्निंग कौन्सिल सदस्य यांनी शाळेचे प्राचार्य नूर शेख,पर्यवेक्षिका श्रीम.शेलार तसेच यशस्वी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे सर्व शिक्षक व उज्वल यश संपादन करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून विद्यार्थ्यांच्या पालकांना व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

मा.खा. कर्मवीर शंकरराव काळे यांनी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या मुलांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण मिळावे यासाठी गौतम पब्लिक स्कूल हि इंग्रजी माध्यमातील शाळा सुरू केली. राज्यातील नावाजलेली शाळा म्हणून गौतम पब्लिक स्कूलकडे पाहिले जाते.

संस्थेच्या सचिव सौ. चैतालीताई काळे यांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यासाबरोबरच क्रीडा क्षेत्रातही गौतम पब्लिक स्कूलचा मोठा दबदबा आहे. त्यामुळे दरवर्षी शंभर टक्के निकालाची व उज्वल यशाची ऐतिहासिक परंपरा राखण्याची गोडी गौतम पब्लिक स्कूलला लागलेली असून गौतम मध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी हे फक्त कोळपेवाडी व परिसरातील नव्हे तर संपूर्ण राज्याच्या कानाकोपऱ्यातील  विद्यार्थी शिक्षण घेत आहेत आणि आपले उज्वल भविष्य घडवीत आहेत.

विद्यार्थी व पालकांच्या  विश्वासाला सार्थ ठरवून सर्व शिक्षक वृंद योग्य न्याय देवून आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत आहे. त्यामुळे विद्यार्थी व पालकांच्या विश्वासाला पात्र ठरलेल्या गौतम पब्लिक स्कूल मध्ये दरवर्षी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची मोठी झुंबड उडालेली असते व दरवर्षी  शाळा सुरु होण्यापूर्वीच प्रवेश क्षमता पूर्ण झाल्यामुळे असंख्य विद्यार्थ्यांची ईच्छा असून देखील या विद्यार्थ्यांना गौतम मध्ये प्रवेश देता येत नाही याची खंत जरूर आहे मात्र गौतम पब्लिक स्कूल मध्ये गुणवत्तेबाबत तडजोड होत नाही. – सौ.चैतालीताई काळे