शेवगाव तालुक्यातील गरजूवंतांना रेशन कार्ड द्या – शेख

शेवगाव प्रतिनिधी, दि. १२ : तालुक्यातील अनेक गोरगरीब नागरिकांना  रेशनचा माल मिळाला पाहिजे. अद्याप अनेक गरजवंत रेशनच्या माला पासून वंचित आहेत. अशा गरजवंता साठी रेशनकार्डचे वाटप करण्यासाठी महसूल प्रशासनाने कॅम्प घेऊन त्यांचा प्रश्न सोडवावा अशी  मागणी जय शिव संग्रामचे दिव्यांग तालुका प्रमुख जावेद शेख, उपाध्यक्ष शब्बीर शेख व युवकांचे तालुका प्रमुख विकास गटकळ यांनी तहसीलदार यांचेकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, तालुक्यातील असंख्य गोरगरीब नागरिक रेशनचा माल मिळत नसल्याने  रेशन कार्डसाठी सेतू विभागाशी संपर्क करतात परंतु सेतू विभागाकडून वेगवेगळे कारण सांगितले जात असल्याने हेलपाट्या शिवाय त्यांना काहो मिळत नाही.

अशा  गरजवन्त नागरिकांना रेशन कार्ड मिळणेसाठी आपल्या पातळीवरून मंडल निहाय कॅम्प घेण्यात यावे व त्यांना तात्काळ रेशन कार्ड मिळावीत.
अन्यथा २२ जुलै रोजी अशा गरजवंतासह आपल्या कार्याल्यासमोर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल असा इशारा देण्यात आला आहे.