विमा सुरक्षा काळाची गरज – बिपीनदादा कोल्हे 

कोपरगांव प्रतिनिधी, दि. ११ :  आपत्ती ही कधीही सांगुन येत नाही, बदलत्या जीवनशैलीमुळे मानवाच्या आजारात वाढ होत आहे त्यासाठी विमा ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी केले. 

येथील सहकाररत्न शंकरराव कोल्हे शेतकरी सहकारी संघाचे उपाध्यक्ष बाजीराव मांजरे हे किडनीच्या विकाराने आजारी होते त्यांना निवा बुपा इंशुरन्स कंपनीच्यावतीने ७७ हजार रूपयांचा विमा धनादेश शनिवारी कारखाना कार्यस्थळावर प्रदान करण्यांत आला त्याप्रसंगी ते बोलत होते. 

  याप्रसंगी अध्यक्ष अंबादास देवकर, संचालक प्रकाश सांगळे, रामदास शिंदे, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे साखर सरव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे आदि उपस्थित होते. भिवराज जावळे यांनी त्यांच्या मेडीक्लेमच्या कागदपत्रांची पुतर्ता करून याकामी विशेष सहकार्य केले. 

  कोल्हे पुढे म्हणाले की, सध्याचे युग हे स्पर्धेचे आहे त्यात प्रत्येक बाबींवर अनेकांनी नागरिकांना परवडतील अशा स्वरूपात असंख्य विमा योजना आणल्या आहेत, हे विमे आपत्तीच्या काळात उपयोगी पडतात.