निवडणुकीत न लढता ही कोल्हे जिंकले, जिल्ह्यात रंगली चर्चा
कोपरगाव प्रतिनिधी, दि. २५ : कोपरगाव विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीत कोल्हे परिवाराने ऐनवेळी निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतल्याने त्यांना मानणाऱ्या मतदार संघातील कार्यकर्त्यांचा हिरमुड झाला. गेल्या पाच वर्षांपासून कोल्हेंच्या विजयासाठी निवडणुकीची तयारी करणारे कार्यकर्ते अचानक विरोधकांच्या विजयासाठी काम करु लागले. केवळ कोल्हे परिवाराने महायुतीचा धर्म पाळण्याचे ठरविल्याने.

कोपरगाव मतदार संघातील पारंपारिक विरोधक असलेले काळे यांच्यासाठी सहकारी म्हणून कोल्हे या निवडणुकीत काम करीत होते. ते उघड आले नाही, पण गुप्त काम करुन काळेंसाठी विजयाची सुप्त लाट निर्माण केले. भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे, संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे, युवा नेते विवेक कोल्हे, संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे कार्यकारी विश्वस्त अमित कोल्हे, सुमित कोल्हे यांनी महायुतीचे उमेदवार आमदार आशुतोष काळे यांच्या विजयासाठी आपली सर्व यंञणा कामाला लावून सर्वाधिक मताधिक्य मिळवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केल्यामुळे आमदार काळे यांना विक्रमी तब्बल १ लाख २६ हजार ६२४ मताधिक्य मिळाले.

पारंपारिक विरोधक असुनही केवळ युतीचा धर्म पाळण्यासाठी कोल्हे परिवाराने केलेले सहकार्य आमदार काळे यांच्यासह शेजारच्या तालुक्यांना फायद्याचे ठरले. कोल्हे यांचे शेजारच्या अनेक तालुक्यांत कार्यकर्ते, कर्मचारी, तसेच नाते गोते असल्याने त्यांचा बहुतांश ठिकाणी प्रभाव आहे. कोल्हे यांच्या योग्य भुमिकेमुळे महसुली मंञी राधाकृष्ण विखे पाटील यांनाही हि निवडणुक सुखकर झाली. कोल्हे यांनी विखे विरोधात काम न करता उलट युतीचा धर्म म्हणुन सहकार्य केले. त्यामुळे या विधानसभेच्या निवडणुकीत निवडणुक न लढता ही’ कोल्हे थांबुनही जिंकले’ अशी चर्चा जिल्ह्यात रंगली आहे.

या निवडणुकीच्या तोंडावर अनेकांनी या पक्षातुन त्या पक्षात जावून निवडणुकीच्या रिंगणात उतरले. मतदार संघात पोषक वातावरण असतानाही कोल्हेंनी थांबून घेतले. निवडणुकीचा निकाला महायुतीच्या बाजुने लागला. स्पष्ट बहुमत महायुतीला मिळाला. कोल्हे थांबले अर्थात ते चाणक्य ठरले. ज्यांनी ज्यांनी पार्ट्या बदलले ते आज अडचणीत आले.

संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी आपल्या कुटूंबासह एक पक्षी, एक वाक्यात एक निर्णय घेतला आणि मतदार संघासह आजूबाजूच्या मतदार संघाला महायुतीसाठी सकारात्मक वातावरण झाले. कोल्हेंनी भाजपसह महायुतीसाठी केलेला राजकीय त्याग आज लक्षवेधी ठरला आहे. न लढता ते विजयाचे शिल्पकार असल्याची भावना नागरीकांमधून व्यक्त होत आहे.

आपल्या राजकीय फायद्यासाठी पार्ट्या बदलणाऱ्यांना कोल्हे यांच्या भूमिकेतून एक नवा आदर्श निर्माण करणारा संदेश दिला आहे. वरिष्ठ भाजपचे नेते व केंद्रीय नेतृत्वाला कोल्हे यांच्या राजकीय त्याची जाणीव ठेवून दिलेला शब्द पाळला तरच जनमाणसामध्ये शब्दांची किंमत सत्यात दिसेल. केवळ शब्दावर विश्वास ठेवून काम करणारे कोरपगावकर आहेत हे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भर सभेत शब्द दिला होता की, आमदार आशुतोष काळे यांना विक्रमी मताधिक्य दिले तर त्यांना राज्यात काम करण्याची मोठी संधी देवू म्हणाले, त्या शब्दाला मतदार संघातील जनता जागली आता काळेंना मंञी करुन दिलेला शब्द पाळावा अशी आशा आहे. तसेच कोल्हे यांना दिलेला शब्द पाळून त्यांचही राजकीय पुनर्वसन होईल अशी अपेक्षा नागरीकांमध्ये वाढली आहे.

काहीही झालं तरी या निवडणुकीत काळे यांनी आपली संयमी भूमिका बजावत सर्वांना एकञ घेवून निवडणूक लढवली त्यात त्यांना सर्वाधिक मताधिक्य घेवून विजयाचा नवा विक्रम केला आहे. महायुतीचा सर्वांनी प्रमाणिक धर्म पाळला आणि विजयाचा विक्रम झाला.

आमदार आशुतोष काळे विजयी झाल्या बरोबर मनाचा मोठेपणा दाखवत माजी आमदार स्नेहलता कोल्हे, संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांचा त्यांच्या निवासस्थानी जावून आशीर्वाद घेतला. तर तितक्याच मोठ्या मनाने स्नेहलता कोल्हे, बिपीन कोल्हे, युवा नेते विवेक कोल्हे, अमित कोल्हे सुमित कोल्हे यांनी आमदार काळे यांचे अभिनंदन करीत स्वागत केले. काळे-कोल्हे यांचा राजकीय सलोखा यातून स्पष्ट दिसून आला.
